पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आता जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या पुंछ येथे दिमाखात उभा राहणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त पुणे येथून निघालेली भव्य 'शिवस्वराज्य यात्रा' राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल झाली. यावेळी 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषात या रथाचे आणि शिवरायांच्या पुतळ्याचे अत्यंत उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले.


या गौरवशाली सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, ,महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, आम्ही पुणेकर' संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन केले. यावेळी दिल्लीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने मराठी बांधव उपस्थित होते.


आयुक्त आर. विमला यांनी सांगितले की भारतीय सेना सीमेवर शौर्याने कार्यरत आहे. सीमेवर उभारण्यात येणारा हा पुतळा जवानांना आणि देशवासीयांसाठी प्रेरणादायी ठरेल.


मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारा हा पुतळा पुणे येथून रवाना झाला असून, त्याने पुणे - मुंबई - बडोदा - अहमदाबाद - उदयपूर - जयपूर असा प्रवास करत दिल्ली गाठली आहे. इथून पुढे हा रथ पानिपत आणि पठाणकोट मार्गे पुंछ येथे पोहोचणार आहे. या प्रवासात ठिकठिकाणी शिवप्रेमींकडून रथाचे स्वागत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, प्रतापगड यांसह युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या 11 किल्ल्यांची आणि तमिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांची माती आणि पवित्र पाणी नेण्यात येत आहे.


या स्मारकाचे आणि पुतळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे पुण्याचे ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर आणि त्यांच्या तिसऱ्या पिढीतील कलाकार विपुल आणि विराज खटावकर यांनी या नऊ फूट उंच पुतळ्याची निर्मिती केली आहे. हा पुतळा उच्च दर्जाच्या फायबरपासून तयार करण्यात आला असून, त्याची रचना अत्यंत देखणी आणि प्रेरणादायी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे अशाच प्रकारे पुतळा उभारण्यात आला होता. त्यानंतर आता पुंछ येथे अधिक भव्य पुतळा बसवून परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे.


या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन 'आम्ही पुणेकर' संस्था, 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' आणि 'श्री शिवशंभू विचार मंच' यांच्या वतीने करण्यात आले आहे. 'आम्ही पुणेकर' संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, विश्वस्त अखिल झांजले, विपुल कांबळे आणि संदीप मते यांनी या मोहिमेचे नियोजन केले आहे. या कार्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.


या स्मारकाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याची सुरक्षा आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी भारतीय लष्कराच्या 'मराठा लाइट इन्फंट्री' (MLI) कडे सोपवण्यात आली आहे. पाकिस्तान सीमेपासून (LOC) अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी ५०० जवान तैनात असून, त्यांनी या स्मारकाची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. केवळ पुतळाच नाही, तर या ठिकाणी शिवरायांच्या इतिहासावर आधारित एक विशेष संग्रहालय आणि 'लाईट अँड साऊंड' शो देखील आयोजित करण्याचे नियोजन आहे, जेणेकरून सीमेवर तैनात असलेल्या जवानांना आणि पर्यटकांना शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास अनुभवता येईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यात या अश्वारूढ पुतळ्याचे अधिकृत अनावरण होणार असून, हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक

Chitrakoot Flood : चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदीला महापूर; रामघाट परिसर पाण्याखाली, 200 जणांची सुटका

चित्रकूट : उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात मंदाकिनी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली

Swine Flu : महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र,