Delhi Airport : पश्चिम आशियातील तणावामुळे दिल्ली विमानतळावरील उड्डाणे विस्कळीत

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये वाढत्या संघर्षामुळे दिल्ली विमानतळावरील अनेक उड्डाणांवर परिणाम झाला आहे. काही फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या असून अनेक उड्डाणे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमानतळावर प्रवासी चिंताग्रस्त आणि त्रस्त अवस्थेत दिसून आले.


यासंदर्भात एका प्रवाशाने सांगितले की, मध्यपूर्वेतील परिस्थिती गंभीर झाल्यामुळे मक्का-मदीना येथे जाण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. संघर्षामुळे अनेक देशांच्या विमानसेवा प्रभावित झाल्या आहेत. मात्र, एका सौदी एअरलाइनची सेवा वेळेवर सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतासह इतर देशांच्या विमानकंपन्यांच्या उड्डाणांमध्ये विलंब आणि रद्द होण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांना गैरसोय होत आहे. दरम्यान, एक कुटुंब उमरासाठी दिल्लीहून सौदी अरेबियाला रवाना होणार होते. या कुटुंबातील एका प्रवाशाने सांगितले की, आम्ही उमरा करण्यासाठी मक्का येथे जात आहोत. सध्याची परिस्थिती कठीण आहे, परंतु आमची वेळ आल्याने आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही अर्ज खूप आधी केला होता, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे सामान्य होती.


यासोबतच एका महिला प्रवाशाने सांगितले की भारत आणि सौदी एअरलाइनच्या उड्डाणे सुरळीत सुरू आहेत आणि कोणतीही अडचण आलेली नाही. हज यात्रेकरूंची विशेष काळजी घेतल्याबद्दल त्यांनी सौदी एअरलाइनचे कौतुक केले. उपलब्ध माहितीनुसार, सौदी एअरलाइनने आपली कोणतीही फ्लाइट रद्द केलेली नाही. दुसऱ्या एका प्रवाशाने भीती व्यक्त करताना सांगितले की, थोडी भीती वाटते, पण ईश्वरावर विश्वास आहे. तो आपले रक्षण करेल. आपण विश्वास ठेवला पाहिजे. तो आपल्याला कधीही एकटे सोडणार नाही असे त्यांनी सांगितले. दरम्यान पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय हवाई सेवांवर होत असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित विमानकंपन्यांकडून अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Chamoli tunnel tragedy : ७ कामगारांचा मृत्यू; ३ अद्याप बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा