मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

देखभालीच्या कामांमुळे मार्गात बदल


मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी त्यांच्या सोयीनुसार प्रवासाचे नियोजन करावे आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेच्या अधिकृत घोषणांसाठी, तुम्ही मध्य रेल्वेच्या अधिकृत किंवा पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.


मध्य रेल्वे


मुख्य मार्ग


कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : स ११.०५ ते दु ३.४५
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड–माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.


ट्रान्स हार्बर मार्ग


कुठे : ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप-डाऊन
कधी : स.११.१० ते दु ४.१०
परिणाम : ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ – ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील. ठाणे–वाशी/नेरुळ/पनवेल अप-डाऊन मार्गावरील लोकल रद्द आहेत.


पश्चिम रेल्वे


कुठे : बोरिवली – गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर
कधी : स. १० ते दुपारी ३ पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत गोरेगाव–बोरिवलीदरम्यान अप -डाऊन मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येतील. तर, अंधेरी आणि बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.

Comments
Add Comment

रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने रेल्वेअपघातांबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. मंत्रालयाने त्यांच्या डेटा

महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत जाहीर, आणखी २९६ सदनिकांसाठी काढणार लॉटरी

एकूण ४२६ पैकी ३७३ अर्जदारांना लागली घरांची लॉटरी मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन

अखेर मुलुंड अगरवाल रुग्णालय लोकांसाठी होणार खुले

रविवारी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकार्पण मुंबई : मुंबई महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम

मुलुंडमध्ये आता देश विदेशातील पक्ष्यांचे घडणार दर्शन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षी उद्यानाचे भूमिपुजन मुंबई : मुंबईच्या उपनगरीय भागात

रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती

मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी

दहिसर–जुहू रडार स्थलांतर आणि Housing for All; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाचं निवेदन

मुंबई : मुंबईतील तील रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी ‘Housing for All’ अंतर्गत नवीन धोरण मांडण्यात आले आहे. फनेल