‘ह्युमन कोकेन’चा धडकी भरवणारा ट्रेलर

‘ह्युमन कोकेन’चा ट्रेलर अखेर विविध माध्यमांवर प्रदर्शित झाला असून काही क्षणांतच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धक्कादायक दृश्यांची मालिकाच जणू या ट्रेलरमध्ये उलगडत जाते. गुन्हेगारी, अमली पदार्थांचा व्यापार आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या निष्ठूर संघर्षाच्या लपलेल्या जगाचे उघड, क्रूर आणि निःसंकोच चित्रण यातून दिसते.


या ट्रेलरमध्ये पुष्कर जोग अगदी नव्याच रूपात झळकतो. तो पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात झळकणार असून त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. एका भयावह जाळ्यात अडकलेल्या कैद्याची तो भूमिका साकारत आहे. जिथे सुटकेची किंचितही शक्यता उरलेली नाही. रोमँटिक आणि हलक्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी इशिता राज प्रथमच एका काळोख्या आणि धगधगत्या व्यक्तिरेखेत दिसते. पुष्करसोबत कैद झालेली तिची भूमिका ट्रेलरला भावनिकता देते आणि प्रत्येक पडद्यावरील क्षणातील तणाव आणखी गहिरा करते. सिद्धांत कपूर आपल्या हटके आणि धाडसी रूपात लक्ष वेधून घेतो. त्याचे रूप, त्याची उपस्थिती सर्व काही रहस्य आणि अस्वस्थता वाढवणारे आहे. तर ज्येष्ठ अभिनेते जाकीर हुसेन अंगावर काटा आणणाऱ्या भूमिकेत दिसत आहेत. पडद्यावर त्यांची उपस्थितीच भीती निर्माण करण्यास पुरेशी ठरते. ‘ह्युमन कोकेन’ ही कथा अत्यंत महागड्या, नव्या आणि मानवी मन सुन्न करणाऱ्या अमानुष प्रक्रियेतून तयार होणाऱ्या कोकेनच्या प्रकाराभोवती फिरते. या निःसंवेदनशील सत्याच्या गर्तेत पुष्कर जोग आणि इशिता राज सापडतात आणि त्यांचा या भीषण अंधाऱ्या जगात कसा ऱ्हास होतो, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. निखळ वास्तवावर आधारित ही कथा अंडरवर्ल्डच्या अंधाऱ्या आणि दडवलेल्या जगाचा पर्दाफाश करणारी आहे.


दिग्दर्शक व लेखक सारिम मोमिन म्हणतात, ‘ह्युमन कोकेन हे आपल्या आसपास दबा धरून बसलेल्या भयावह वास्तवाचे प्रतिबिंब आहे. हा चित्रपट सोपा नाही, तो जाणूनबुजून अस्वस्थ करण्यासाठी, विचारांना कुरवाळण्यासाठी आणि संवादाला चालना देण्यासाठीच बनवला आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या माध्यमातून समाजातील लपलेली बाजू उजेडात आणली आहे.’
इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही प्रभावी ब्रिटिश कलाकारांच्या दमदार भूमिकांनी सजलेला हा चित्रपट आंतरराष्ट्रीय धाटणीचा अनुभव देतो. सारिम मोमिन लिखित–दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती स्कार्लेट स्लेट स्टुडिओज, वाइनलाइट लिमिटेड, टेक्स्टस्टेप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि गूजबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. निर्मातेची तेंग जू आणि हरीत देसाई. छायाचित्रण सोपन पुरंदरे, संपादन संदीप फ्रान्सिस, दमदार पार्श्वसंगीत क्षितिज तारे यांचे असून नृत्यदिग्दर्शन पवन शेट्टी व खालिद शेख यांनी सांभाळले आहे.
युनायटेड किंगडममध्ये बऱ्याच प्रमाणात चित्रीत झालेला ‘ह्युमन कोकेन’ हा केवळ चित्रपट नसून आपण जाणीवपूर्वक टाळत असलेल्या, भयावह आणि काळोख्या जगाचे खरे, कठोर आणि निःसंकोच प्रतिबिंब आहे. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईला आल्यावर ‘कलावैभव’मध्ये काम करण्याची मिळाली संधी : सचिन देशपांडे

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  सचिन देशपांडे यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपले स्थान भक्कम केले आहे. गेली पंचवीस

रंगकर्मींच्या नाट्यकट्ट्याची मुहूर्तमेढ...!

राजरंग : राज चिंचणकर नाट्यसृष्टीत विविध उप्रक्रमांची पायाभरणी केली जाते आणि यातले काही उपक्रम सातत्याने सुरु

व्याधींच्या आधीची समाधी

भालचंद्र कुबल : पाचवा वेद आमच्या पुष्पा भावे मॅडम नेहमी जयंताची उदाहरणे द्यायच्या, जयंता म्हणजे जयंत पवार..! मला

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेने येसूबाई म्हणून ओळख दिली

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  इतिहासाची साक्ष आणि वर्तमानाचा संघर्ष यांची सांगड घालणारा 'भिडेवाडा' हा चित्रपट

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी रंगणार

शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा

कलाकारांची चैतन्यमय गुढी...

राजरंग : राज चिंचणकर पली संस्कृती, परंपरा आपल्या सण आणि उत्सवांत अधिक उजळून निघते. नववर्षाचा शुभारंभ करत चैतन्य