Sunday, January 18, 2026

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये एकाहून एक असे हिट ,सरस चित्रपट केलेत. सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. ते ७५ वर्षांचे झाले आहेत. त्यांनी ५० वर्षांच्या कारकिर्दीत १७० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं आहे पण तुम्हाला रजनीकांत यांचे खरे नाव माहीत आहे का ? त्यांच्या खऱ्या नावाबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे , तर मग जाणून घेऊया..

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० साली बंगळुरू येथे झाला. त्यांचे वडील रामोजी राव गायकवाड हे पोलिस कॉन्स्टेबल होते तर आई गृहिणी होती. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड असे आहे.

रजनीकांत यांनी १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या “अपूर्व रागंगल” या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बालचंदर दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली. त्यानतंर १९७८ मध्ये आलेल्या ‘भैरवी’ चित्रपटात ते प्रमुख अभिनेता म्हणून झळकले. रजनीकांत चित्रपटसृष्टीत ५० पेक्षा जास्त वर्षांपासून सक्रीय आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १७० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सुपरस्टारने तमिळ, हिंदी, तेलगू, कन्नड,बंगाली आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं असून त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.

कामाबद्दल बोलायचं झालं तर रजनीकांत हे शेवटचे “कुली” चित्रपटात दिसले होते. हा २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. तcharectersर आता रजनीकांत हे ‘जेलर २’मध्ये दिसतील. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. रजनीकांत कमल हासन यांच्यासोबतही एका चित्रपटावर काम करत आहेत.

Comments
Add Comment