पंजाब किंग्सची धुरा श्रेयस अय्यरकडे?

रिकी पाँटिंगच्या अनुपस्थितीत संघ निवडण्याची जबाबदारीही येणार


मुंबई  : बीसीसीआय सध्या आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची तयारी करत आहे. या दरम्यान, मागील हंगामातील फायनलिस्ट असलेल्या पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर लिलावात सहभागी होणार आहे. अय्यरने आता मजबूत संघ तयार करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली जाण्याची शक्यता आहे. मात्र, या वेळी पंजाब किंग्सला त्यांचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांची कमतरता जाणवणार आहे, कारण त्यांनी मिनी लिलावातून स्वतःला बाजूला केले आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा दिग्गज (डॅनियल व्हिटोरी) मात्र आपल्या संघाला सोडत नाही.


रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२६च्या मिनी लिलावात पंजाब किंग्सच्या टेबलवर कर्णधार श्रेयस अय्यर दिसण्याची शक्यता आहे. अय्यर सध्या पूर्णपणे फिटनेस मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि याच कारणामुळे तो टेबलवर उपस्थित राहू शकतो. पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग मात्र टेबलवर दिसणार नाहीत.


पाँटिंग सध्या ‘द ॲशेस २०२५-२६’ मध्ये कॉमेंट्री करत आहेत. तिथून त्यांना रिलीज केले जाणार नाही. त्यामुळे ते ऑस्ट्रेलियातूनच आपल्या संघाला मदत करतील. लिलावाच्या वेळी एका संघाच्या टेबलवर फक्त ८ सदस्यच उपस्थित राहू शकतात. त्यामुळे सर्व फ्रँचायझी या सदस्यांची यादी आधीच बीसीसीआयला पाठवतात. ऑस्ट्रेलिया संघासोबत जोडलेले डॅनियल व्हिटोरी (सनरायझर्स हैदराबादचे कोच) मात्र या लिलावात उपस्थित राहतील. त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाशी याबद्दल चर्चा केली आहे. सनरायझर्स हैदराबादने मागील हंगामात फार चांगली कामगिरी केली नव्हती. त्यामुळे व्हिटोरी या वेळी टेबलवर बसून मागील हंगामातील चुका सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील