मुद्रांक शुल्क वादाबाबत उच्च न्यायालयाऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील

विधानसभेत सुधारणा विधेयक एकमताने मंजूर


महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधयेक


​नागपूर :  मुद्रांक शुल्काशी संबंधित वादांमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य विधिमंडळाने घेतला आहे. 'महाराष्ट्र मुद्रांक (दुसरी सुधारणा) विधेयक २०२५' विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले असून, यामुळे आता मुद्रांक शुल्काच्या वादात नागरिकांना उच्च न्यायालयात धाव घेण्याऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील करण्याची सुलभ संधी उपलब्ध होणार आहे.


​महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक (सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक १०३) विधानसभेत मांडले. या विधेयकावर चर्चा करताना आमदार भास्कर जाधव आणि अतुल भातखळकर यांनी आपली मते मांडली, त्यानंतर सभागृहाने हे विधेयक एकमताने मंजूर केले.



​नेमका बदल काय?chandra


सध्याच्या 'महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८' मधील तरतुदींनुसार, मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध केवळ उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करूनच दाद मागता येत होती. यामुळे उच्च न्यायालयावर खटल्यांचा भार वाढत होता आणि पक्षकारांचा न्यायालयीन खर्चही वाढत असे. तसेच, न्यायालयात प्रकरणे प्रलंबित राहिल्यामुळे शासचाचा महसूल मोठ्या कालावधीसाठी अडकून पडत असे.


​यावर उपाय म्हणून या सुधारणा विधेयकाद्वारे अधिनियमात नवीन 'कलम ५३ब' समाविष्ट करण्यात आले आहे. या नव्या तरतुदीनुसारमुख्य नियंत्रक महसूल प्राधिकाऱ्याच्या आदेशाने व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती आता आदेश मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करू शकेल.​या अपिलासाठी एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर योग्य तो निर्णय देईल आणि हा निर्णय अंतिम असेल.



विधेयकाचे उद्दिष्ट


या सुधारणेमुळे उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी होईल आणि सामान्य नागरिकांचा वेळ व पैसा वाचेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. तसेच, शासनाचा अडकलेला महसूल लवकर मोकळा होण्यास मदत होईल, असेही या विधेयकाच्या उद्देश व कारणांच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या विधेयकामुळे कलम ३२ क आणि कलम ५३ मध्येही अनुषंगिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. नागरिकांना जलद न्याय मिळावा आणि प्रशासकीय कार्यवाही सुलभ व्हावी, या हेतूने हे विधेयक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा