GPS Tracker : नातवाच्या हुशारीमुळे सापडली हरवलेली आजी ,माळेतल्या जीपीएस ट्रॅकरची कमाल !

मुंबई : नातवाने GPS ट्रॅकर वापरून हरवलेल्या आजीला शोधून काढले.मोबाइलच्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत त्याने परळमधील रुग्णालयात आजीचा पत्ता शोधला.ही घटना तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराचे उत्तम उदाहरण आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मिनी GPS ट्रॅकरची लोकप्रियता वाढत असून,ते वृद्ध व्यक्ती आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.


आजकालची तरूण पिढी खूप स्मार्ट आहे,पण सतत मोबाईल आणि टेक्नॉलॉजीमध्ये गुंतलेली असते,फोनच्या डबड्यात डोकं घालून बसलेली असते,अशी टीका तरूणाईवर नेहमी होत असते.मात्र याच स्मार्ट पिढीतील एका तरूणाने टेक्नॉलॉजीचा वापर सार्थ ठरवा आणि हरवलेल्या वृद्ध महिलेला शोधून काढलं.मुंबईत राहणाऱ्या एका तरूणाने अगदी फिल्मी अंदाजात त्याच्या हरवलेल्या वृद्ध आज्जीला शोधून काढलं.आज्जीला शोधण्यासाठी तिच्या नातवाने चक्क GPS ट्रॅकरची मदत घेतली.तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन एका नातवाने आपल्या बेपत्ता झालेल्या आजीचा शोध घेतला.त्याचं खूप कौतुक होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,3 डिसेंबरला ही घटना दक्षिण मुंबईत घडली.त्या दिवशी संध्याकाळी सायरा बी ताजुद्दीन ही 79 वर्षांची महिला फेरी मारण्यासाठी घराबाहेर पडली होती,पण ती रात्री उशीरापर्यंत घरी परत आली नाही,त्यामुळे कुटुंबीय खूप चिंतेत होते.त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. बाहेर गेलेल्या सायरा यांना शिवडी भागात एका वाहानन धडक दिली,त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.आजूबाजूच्या लोकांनी तातडीने त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. पण सायरा यांच्या कुटुंबियांना या घटनेची काहीत माहिती नव्हती, ते त्यांचा शोध घेत होते.


नातवाने असा घेतला आजीचा शोध


तेवढ्यात सायरा यांच्या नातवाने एक युक्ति केली.त्याने आपल्या आजीच्या गळ्यात असलेल्या माळेत एक छोटासा GPS ट्रॅकर बसवला होता.नातू मोहम्मद वासिम अय्यूब मुल्ला याने त्याच जीपीएस डिव्हाइसची मदत घेतली आणि आजीचं लोकेशन शोधायला सुरूवात केली.त्याने मोबाीलमध्य जीपीएस ओपन करून आजीचं लोकेशन ट्रॅक केलं.त्यांचं लोकेशन परळच्या केईएम रुग्णालय दाखवत होते.त्यानंतर त्या वृद्ध महिलेचे संपूर्ण कुटुंब तिच्याजवळ पोहोचले.आणि त्या महिलेला केईएममधून जे.जे.रुग्णालय रेफर करण्यात आले.जीपीएसच्या मदतीने वृद्ध महिलेची तिच्या कुटुंबियांशी पुन्हा भेट झाली.

Comments
Add Comment

प्रारुप मतदार यादीबाबत १०,६६८ तक्रारींचे निवारण

कंट्रोल चार्टद्वारे मतदार यादीची केली जाते पडताळणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता