नवी दिल्ली: आज ठरल्याप्रमाणे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी युएसचे व्यापार विभागाचे उपप्रमुख प्रतिनिधी रिक स्विझटर (Rick Swizter) यांच्याशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारत व युएस यांच्यातील संबंधावर तोडगा काढण्यासाठी महत्वपूर्ण चर्चा केल्याची माहिती व्यापार विभागाचे दिली आहे. त्यानुसार त्यांनी भारत व युएस यांच्यातील परराष्ट्र मुद्यावर महत्वाची चर्चा केली आहे. युएस भारत व्यापार, आर्थिक व तांत्रिक भागीदारी व जागतिक पुरवठा साखळीत (Global Supply Chain) दोन्ही देशातील संरचनात्मक बांधणी यावर चर्चा झाल्याचे समजते. व्यापार विभागाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी एक्सवर याविषयी पोस्ट करत माहिती दिली.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये,'परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अमेरिकेचे उप-व्यापार प्रतिनिधी रिक स्वित्झर यांची भेट घेतली. भारत-अमेरिका यांच्यातील मजबूत आर्थिक आणि तंत्रज्ञान भागीदारी, चालू व्यापार वाटाघाटी आणि द्विपक्षीय व्यापार आणि लवचिक पुरवठा साखळी वाढवण्याच्या संधी यावर चर्चा झाली' असे जैसवाल यांनी म्हटले आहे.
प्रामुख्याने रिक स्वित्झर हे भारत सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी भारतात आले आहेत. त्यामुळे याबाबत पडद्यामागे राजकीय हालचालींना वेग आल्याचे स्पष्ट होत आहे. दोन्ही बाजूंमध्ये आधीच द्विपक्षीय चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत अद्याप यश आलेले नाही. नुकत्याच केलेल्या वक्तव्यात वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज,'प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर अमेरिकेशी चर्चा प्रगतीपथावर आहे' असे म्हटले होते. त्यांनी पुढेसांगितले की, अमेरिकेचे पथक वाटाघाटीसाठी नवी दिल्लीत आले आहे.
त्यांच्याशी चर्चा सातत्याने सुरू आहे. आम्ही द्विपक्षीय व्यापार कराराकडे वाटचाल करत आहोत असे गोयल यांनी प्रवासी राजस्थानी दिवस येथील कार्यक्रमात पत्रकारांना सांगितले. त्यांनी संकेत दिले की ते भेट देणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटू शकतात.उप-अमेरिका व्यापार प्रतिनिधी (यूएसटीआर) रिक स्वित्झर यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ त्यांचे भारतातील राजेश अग्रवाल यांच्याशी दोन दिवसांच्या व्यापार चर्चेसाठी दिल्लीत आले आहे.
भारत आणि अमेरिका कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी काम करत असल्याने ही भेट महत्त्वाची असल्याची सांगितली जाते. रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीमुळे अमेरिकन बाजारात येणाऱ्या भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के कर आणि २५ टक्के अतिरिक्त दंड लादल्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांचा हा दुसरा दौरा भारतात आहे.अमेरिकन अधिकाऱ्यांनी शेवटचा दौरा १६ सप्टेंबर रोजी भारतात केला.
यापूर्वी २२ सप्टेंबर रोजी गोयल यांनी व्यापार चर्चेसाठी अमेरिकेला अधिकृत शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. त्यांनी मे महिन्यात वॉशिंग्टनलाही भेट दिली होती. नुकतेच वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे की,भारत या वर्षीच व्यापार करार तडीस पोहोचवेल अशी आशा बाळगतो. ज्यामुळे भारतीय निर्यातदारांच्या फायद्यासाठी टॅरिफचा प्रश्न सोडवला जाईल.'