सप्तशृंगगड घाटात इनोव्हा कार ७०० फूट दरीत कोसळली; सहाजण ठार

सप्तशृंगगड : नांदुरी ते श्री सप्तशृंगगड घाटरस्त्यावर रविवारी ( दि.७) संध्याकाळी भाविकांची इनोव्हा कार सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन महिला आणि तीन पुरुष असे सहाजण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या दोन रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन दल, रोपवे कर्मचाऱ्यांचे पथक आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले असून दरीत बचावकार्य सुरू आहे. वाहन खोल दरीत कोसळल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यास मोठी अडचण येत आहे. दोरीच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन दल दरीत उतरून मोबाईलच्या प्रकाशात मृतदेह शोधण्याचे काम करत आहे. ७०० फूट खोल दरी असलेल्या भवरीनाळा धबधबा घाट परिसरात इनोव्हा कार चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनावरील ताबा सुटून ते लोखंडी संरक्षक कठड्यावर आदळले. कठडा कमकुवत असल्याने वाहन थेट दरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच खासदार भास्कर भगरे आणि आमदार नितीन पवार यांनी प्रशासनाशी बोलून तातडीने मदतकार्य गतीमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


सर्व मृत पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी


अपघातात ठार झालेल्या सर्वजण पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. किर्ती पटेल, रशीलाबेन पटेल, विठ्ठल पटेल, लता विठ्ठल पटेल, पचन पटेल, मनिबेन पटेल.


सार्वजनिक बांधकामवर कारवाईची मागणी


ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बेनके आणि सदस्य राजेश गवळी यांनी घाटातील निर्दोष दुरुस्ती न केल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागावर (पीडब्ल्यूडी) मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिककरांनो लक्ष द्या ! उद्या 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद

Nashik : नाशिककरांनो, उद्याच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची बातमी आहे. सातपूर परिसरातील मुख्य गुरुत्ववाहीनीला

Nashik : बंदिस्त पुरचारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जितेंद्र पापळकर

Nashik : बंदिस्त पुरचारी ही जलसंधारण विभागाची पहिली योजना असून, अशा योजनांमुळे पाणी शेवटच्या घटकापर्यंत अतिशय कमी

Nashik News : दिंडोरी, पेठ अन् सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nashik News : नाशिक जिल्हयातील दिंडोरी, पेठ अन् सुरगाणा तालुक्यात मंगळवारी पुन्हा भूकंपाचे धक्के सौम्य धक्के बसले आहे.

Nashik Crime News : CEO ची बनावट आयडी अन् कंपनीला ९६ लाखांना गंडा घालण्याचा प्रयत्न, 'या' एका कृतीने आर्थिक अनर्थ टळला

​Nashik Crime News : सायबर गुन्हेगार आता केवळ ओटीपी किंवा लिंक पाठवूनच नाही, तर कंपनीच्या सीईओचं बनावट प्रोफाइल तयार करूनही

Nashik : गंगापूर धरणातून विसर्गात वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मंगळवारी (दि. २८) दुपारी ४ वाजता मोठी वाढ करण्यात

Nashik : दीक्षांत समारंभ ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या वचनबद्धतेचा सोहळा - राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २५ व्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये राज्याचे