अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला ११५ हून अधिक वर्ष पूर्ण झाली. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून पोर्ट ब्लेअर येथे ‘सागरा प्राण तळमळला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बियोदनाबाद येथे सावरकरांच्या भव्य पुतळ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात येणार आहे. अंदमानमधील श्री विजया पुरम येथे मुंबईतील ‘व्हॅल्युएबल ग्रुप’च्या वतीने १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता ‘सागरा प्राण तळमळला’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने, बियोदनाबाद येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.‘

Comments
Add Comment

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या

Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेला निसर्गाचा 'ब्रेक'! मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे यात्रा स्थगित; ३६ तासांचा हाय अलर्ट

कटरा : उत्तर हिंदुस्थानात सध्या कडाक्याची थंडी आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, याचा मोठा फटका माता

वाहतुकीच्या नियमाचे एका वर्षात पाच वेळा उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, रस्ते

योग, आयुर्वेद अन् ॲलोपॅथीचा संगम

गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते 'हायब्रिड' पतंजली रुग्णालयाचे उद्घाटन  हरिद्वार  : भारताच्या आरोग्य क्षेत्रात

चारही पीठांचे शंकराचार्य १९ वर्षांनी एकाच व्यासपीठावर येणार

दिल्लीत गोमाता रक्षणासाठी १० मार्चला कार्यक्रम नवी दिल्ली: ज्योतिषपीठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद