गोव्यातील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव! २५ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री प्रमोद सांवतांनी दिले चौकशीचे आदेश

अर्पोरा: गोव्यातील अर्पोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. बर्च बाय रोमियो लेन असे या रेस्टॉरंटचे नाव असून गोव्यातील नाईट क्लबसाठी ते प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेल्या या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला, ज्यात चार पर्यटक आणि इतर सर्व क्लबचे कर्मचारी आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते रेस्टॉरंटच्या आतमध्ये गेले तेव्हा धुराचे लोट आणि जमिनीवर पसरलेले मृतदेह दिसले. गोव्यातील अर्पोरा येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये तर जखमींना ५०,००० रुपये मदत जाहीर केली आहे.


या घटनेवर दुःख व्यक्त करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मृतांच्या कुटुंबियांना धीर दिला आहे. त्यांनी सांगितले की, ही राज्याच्या पर्यटन इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक दुर्घटना आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचे परीक्षण करून सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. क्लबमध्ये सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले का? अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का? याची चौकशी सुरू आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाने मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर जखमी आणि बाधित लोकांसाठी मदत केंद्रे सुरू केली जात आहेत.




भाजप आमदार मायकल लोबो यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आणि म्हटले की, गोवा नेहमीच एक सुरक्षित पर्यटन स्थळ मानले गेले आहे. परंतु अशा घटना अत्यंत चिंताजनक आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व क्लब आणि रेस्टॉरंट्सनी अनिवार्य सुरक्षा ऑडिट करावे, असे ते म्हणाले. गोव्याचे डीजीपी आलोक कुमार म्हणाले की, आगीची माहिती मिळताच बचाव पथके तात्काळ रवाना करण्यात आली. सर्व  मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आगीचे कारण सध्या अस्पष्ट आहे. मात्र सिलेंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार

अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला

‘अयोध्या बस झाँकी है, काशी-मथुरा बाकी है’: योगी आदित्यनाथ

सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज चालणार नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८