मालाडकरांना छोटा 'केइएम' ची आरोग्य सुविधा, नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पश्चिम उपनगरात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालाड मालवणी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण शनिवारी ६ डिसेंबर २०२५ रोजी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभहस्ते करण्यात आले, सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून ही सेवा पश्चिम उपनगरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.


वर्षाकाठी मालवणी परिसरातील सुमारे साडेतीन लाख रुग्णांना या केंद्राच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या काळात विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचे मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय, महिला आरोग्य, त्वचाविकार, दंत, क्षयरोग यासारख्या आजारांसाठीची बाह्यरुग्ण विभागाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याठिकाणी वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना नजीकच्या हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, खुरशादजी बेहरामजी भाभा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रू. न. कूपर रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येईल. सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा एकूण ३५ जणांचा चमू या केंद्राच्या ठिकाणी कार्यरत असणार आहे. या कम्युनिटी मेडिसीन विभागामार्फत या चमूमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, २० निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी अशा ३५ जणांचा समावेश आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ४ दरम्यान बाह्यरुग्ण विभागामार्फतची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सकाळ तसेच दुपार सत्रातील बाह्यरुग्ण विभाग सेवेसोबतच विशेष बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.



नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विविध आजारांसाठीची बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या सुविधेसाठी प्रशस्त आसनव्यवस्था आणि प्रतीक्षा कक्षदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिवसापोटी २५० ते ३०० रुग्ण हाताळण्याची या बाह्यरुग्ण विभागाची क्षमता आहे. पाच मजली इमारतीतील तीन मजले हे कम्युनिटी मेडिसीन विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येत्या कालावधीत कर्मचारी संख्या वाढवतानाच अद्ययावत अशी हॉस्पिटल मॅनजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) प्रणालीही अंमलात येणार आहे. वाचनालय, माहिती शिक्षण आणि संवाद सभागृह, सार्वजनिक आरोग्य संग्रहालय, संशोधन केंद्र, लसीकरण कक्ष आदी सुविधाही याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.



या सोहळ्यासाठी स्थानिक आमदार अस्लम शेख, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक (के इ एम)रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सहायक आयुक्त (पी उत्तर) कुंदन वळवी तसेच भाजपचे सुनील कोळी, माजी नगरसेविका योगिता कोळी, विनोद शेलार आदी उपस्थित होते.



दरम्यान,मालवणीत येथील नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी झाल्याने या वास्तूला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची सूचना उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.

Comments
Add Comment

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका