वसई - विरारमध्ये ८० हजार दुबार मतदार?

मतदारयादीत सुधारणा करण्याची बविआची मागणी


वसई : वसई - विरार महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये ५२ हजार दुबार मतदार असल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेने अशा मतदारांकडून मतदान कुठे करणार? याबाबतचे हमीपत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुबार मतदारांची ही संख्या मोठी असून ती ८० हजारांच्या घरात असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला आहे. यासह एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. त्यामुळे या सर्वांची नावे पूर्ववत करावी आणि दुबार मतदार वगळावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.


वसई - विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना पार पडली. महापालिका क्षेत्रात २९ प्रभाग असून चार स्तरीय प्रभाग रचनेनुसार चार सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. प्रभाग रचना पार पडल्यानंतर आरक्षण सोडत प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली.त्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यासाठी बुधवारपर्यंतची मुदत हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी देण्यात आली होती. १ जुलै २०२५ पर्यंतच्या गृहीत धरलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार पालिका हद्दीत ११ लाख २७ हजार ६४० मतदारांची नोंद आहे. यामध्ये ५२ हजार ३७८ मतदारांची नावे ही दुबार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली होती. त्यानंतर पालिकेने दुबार असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार? याबाबतचे हमीपत्र लिहून घेणार असल्याचे सांगत प्रक्रिया सुरु केली आहे.


मात्र दुसरीकडे हरकती आणि सूचना नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन विकास आघाडीने महापालिका हद्दीत ८० हजार दुबार मतदार असल्याचा दावा केला आहे. तसेच एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचे देखील त्यांना निदर्शनास आले आहे. यासह अनेक मतदारांची नावे सारखीच आहेत, फोटो एका मतदाराचा दुसऱ्या मतदाराला एक सारखाच देण्यात आला आहे तर काही ठिकाणी फोटोच नसल्याचे देखील आढळून आल्याचा दावा बविआने केला असून याबाबत त्यांनी महापालिकेला लेखी निवेदन दिले आहे. तसेच या दुबार मतदारांची नावे वगळण्याची मागणी केली आहे.


शोध मोहीम सुरू : वसई-विरार महापालिका हद्दीत मतदारांपैकी ५२ हजार दुबार मतदारांची नावे आयोगाने दिली होती. तसेच आता बविआने देखील ८० हजार मतदार दुबार असल्याचा दावा केला आहे. यासाठी आता नऊ प्रभागात नऊ पथके नेमण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत ५२ हजारांहून अधिक असलेल्या दुबार मतदारांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतली जाणार आहेत. दुबार मतदारांबाबत आयोगाने जो कार्यक्रम ठरवून दिला आहे त्यानुसार आमचे कामकाज सुरु असल्याचे पालिका उपायुक्त स्वाती देशपांडे
यांनी सांगितले.


मतदार याद्यांवर ८ हजार हरकती - सूचना


वसई - विरार महानगरपालिकेने मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ३ डिसेंबर पर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत दिली होती. मंगळवार सायंकाळी उशिरापर्यंत पालिकेकडे ८ हजार ४१६ हरकती आणि सूचना मतदार याद्यांवर नोंदविण्यात आल्या होत्या. बुधवारी सुद्धा हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत.


Comments
Add Comment

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री