हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाही. अखेर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा घेण्यात येत आहे. गुरुवारी एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राची परीक्षा होती. मात्र, श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी दिले जाणारे हॉलतिकीट मिळालेच नाही.


नेमके काय घडले?


विद्यार्थी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हॉलतिकीटसाठी महाविद्यालयात पोहोचले. परंतु, महाविद्यालय प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिस ठाण्यासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या धरल्यानंतर ही स्थिती आणखी गंभीर बनली.


हॉलतिकीट नसल्याने शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. यानंतर पोलिसांनी विद्यापीठाशी संपर्क साधला. विद्यार्थीही विद्यापीठात पोहोचले. तेव्हा उघड झाले की संबंधित महाविद्यालयाला विद्यापीठाचे संलग्नीकरणच नसल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक झाली.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन