मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने ५ डिसेंबर २०२५ रोजी शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी माहिती दिली. या निर्णयामुळे मुंबईतील शाळा उद्या (५ डिसेंबर, २०२५) बंद असणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्यावतीने मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनात संस्थाचालक संघटना तसेच इतर सर्व संघटना सहभागी होणार आहेत
या निवेदनात नमूद केलेले मुद्दे:
राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये. १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावे. तसेच टीईटी परीक्षा अनिवार्य करु नये, ही मुख्याध्यापक महामंडळाची मुख्य मागणी आहे. आता राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. जर टीईटी परीक्षा दिली नाही किंवा परीक्षा पास झाली नाही तर त्या शिक्षकांना काम करता येणार नाही. दरम्यान, आता ही परीक्षा सर्व शिक्षकांना देणे बंधनकारक केले असल्याने हा निर्णय रद्द व्हावा, यासाठीच संपाचा इशारा दिला आहे.
याप्रमाणे १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व विभागातील शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करणे. शिक्षकांना १०-२०-३० वर्षाची आश्वासीत प्रगती योजना लागू करणे. शिक्षणसेवक पद रद्द करून सुरुवातीपासून शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करणे या सह अन्य मागण्यांचा समावेश असणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
मुंबई : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते ...