सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत हाती घेतलेल्या अनेक प्रकल्पांच्या देखभालीसाठी निधी देण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे. परंतु आता या कामांसाठी पुन्हा एकदा प्रशासनाने हात ढिला केला आहे यासाठीच्या कोणत्याही प्रलंबित प्रकल्पासाठी निधी मंजूर केला जात नसतानाच एफ उत्तर विभागातील सुशोभिकरणाच्या कामांकरता देखभालीसाठीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे देखभालीच्या नावावर पुन्हा सुशोभिकरणाच्या कामांसाठी लाखो रुपये स्थगितीनंतरही मंजूर करुन देत असल्याची बाब समोर आली आहे.


सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत एफ/उत्तर विभागातील विविध रस्त्यांवरील विद्यूत खांबांना तिरंगा एल. ई. डी. स्ट्रीप लावुन विद्युत रोषणाईचे काम डिझाईन, पुरवठा, उभारणी, चाचणी, कार्यान्वीतीकरण आणि त्यांच्रूा २ वर्षाच्या हमी कालावधीनंतर पुढील दोन वर्षांच्या देखभालीसाठी पश्च्यात् ३ वर्ष प्रारंभ-सेवा-देखभालीसाठी सन २०२२मध्ये निविदा मागवून कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. या कामाअंतर्गत एफ/उत्तर विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पूर्व मुक्त मार्गाखाली वडाळा, सुलोचना शेट्टी मार्ग, डेविड बरेट्टो मार्ग, रफी अहमद कीडवाई ईत्यादी मार्गावरील विद्यूत खांबांना तिरंगा एल. ई. डी. स्ट्रीप लावुन विद्युत रोषणाईने सुशोभिकरण करुन ही कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.


या प्रकल्पसाठीच्या सुमारे ९० लाख रुपये आणि देखभालीसाठी सुमारे १९ लाख रुपये अशाप्रकारे एकूण १ कोटी ०८ लाख रुपयांच्या कामांसाठी निविदा मागवण्यता आली होती. निविदेत विशाल इंजिनिअरींग कंपनीची निवड करण्यात आली होती आणि कंपनीला सर्व कामांसाठी विविध करांसह सुमारे ७४लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती.


परंतु हे काम आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये पूर्ण झालेले असून यासाठी तरतूद केलेला निधी आर्थिक वर्षांत खर्च न झाल्याने बाद झाला. त्यामुळे या कामाचा खर्च देता आलेला नाही असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे या कामाच्या अधिदानासाठी लागणारा निधी अर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये एफ उत्तर कार्यालयामार्फत मागण्यात आला होता. परंतु आवश्यक निधीच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली नसल्याने या कामांचे पैसे देता आलेले नाही. त्यामुळे या कामाचे पैसे देणे प्रलंबित राहिले. त्यामुळे या कामाच्या अधिदानासाठी लागणारा निधी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उपलब्ध झालेला असल्याने त्यातून या कामाचे पैसे दिले जाणार आहे.


मात्र, सुशोभिकरण प्रकल्पांच्या कोणत्याही कामांसाठी यापुढे निधी मंजूर करून नये तथा त्यासाठी निधी उपलब्ध करून देवून नये अशाप्रकारचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतल्यानंतर महापालिकेच्या लेखा विभागाकडून मागील काही महिन्यांमध्ये अशाप्रकारचे अभिप्राय नोंदवले जात होते. त्यामुळे सुशोभिकरण केलेल्या कामांचा पैसा स्थगिती आदेश असताना आता कसा दिला जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे मागील आर्थिक वर्षांत याला प्रशासकीय मान्यता का देण्यात आली नव्हती आणि आत्ताच का दिली असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या