वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन हजार मंत्र आणि वैदिक श्लोकांचे शुद्ध उच्चारणासह १९ वर्षांच्या देवव्रत रेखे यांनी शुक्ल यजुर्वेदाचे पठण केले आहे. उच्चारणास हे मंत्र अतिशय कठीण असूनह ५० दिवस खंड न पाडता देवव्रत यांनी हे पठण पूर्ण केले आहे. भारताच्या सनातन गुरू परंपरेत यास 'दंडक्रम पारायण' म्हणतात. हे पारायण पूर्ण केल्यानंतर संबंधित व्यक्तीस वेदमूर्ती ही पदवी देऊन सन्मानित केले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवव्रत महेश रेखे यांचे केले कौतुक
पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "भारतीय संस्कृतीवर श्रद्धा असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हे जाणून आनंद होईल की श्री देवव्रत यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यन्दिन शाखेच्या दोन हजार मंत्रांचे 'दण्डकर्म पारायणम्' ५० दिवसांत कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केले. यामध्ये अनेक वैदिक स्त्रोत्र आणि पवित्र शब्दांचा उल्लेख आहे, ज्यांना त्यांनी शुद्ध उच्चारणासह पठण केले. ही कामगिरी आपल्या गुरू परंपरेचे सर्वोत्तम रूप दर्शवते. काशीचा खासदार म्हणून मला अभिमान आहे की त्यांची अद्भुत साधना या पवित्र भूमीवर संपन्न झाली. मी त्यांच्या कुटुंबाला, संतांना, ऋषीमुनींना, विद्वानांना आणि देशभरातील त्या सर्व संस्थांना अभिवादन करतो ज्यांनी या तपश्चर्येत रेखे यांना साथ दिली."
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे येथील श्री देवी भराडी ...
देवव्रत वैदिक मंत्रांचे पठण करत असतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये ते कोणतेही ग्रंथ न पाहता, कुठेही न अडखळता वैदिक मंत्रांचे शुद्ध उच्चारणासह पठण करताना दिसत आहेत. हे यश संपादित केल्यानंतर देवव्रत महेश रेखे यांना ५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे एक आभूषण आणि १ लाख ११ हजार ११६ रोखरक्कम देऊन सन्मान करण्यात आलाय. श्री शृंगेरी शारदा पीठमचे जगद्गुरू शंकराचार्यांच्या आशीर्वादाने त्यांचा सन्मान करण्यात आला.
अगर आपकी स्क्रीन पर ये वीडियो आ गया है तो सब कुछ छोड़कर 6 मिनट निकालकर ये वीडियो देख डालिए।
19 साल के देवव्रत महेश रेखे बीना देखे शुक्ल यजुर्वेद का मंत्रोच्चार कर रहे हैं। अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय। pic.twitter.com/dN3JhGE6Oi
— Shubham Shukla (@Shubhamshuklamp) December 2, 2025