डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये


डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह भोईर यांच्या पत्नी सरोज भोईर, मनसेचे उपशहर जिल्हाध्यक्ष श्रीकांत वारंगे, अशोक म्हात्रे, संदीप म्हात्रे, सचिन सणस, काशिनाथ भोईर, गुरुनाथ मांजरेकर यांच्यासह कल्याण-डोंबिवलीतील शेकडो मनसैनिकांचा समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज त्यांनी पक्षप्रवेश केला. चव्हाण यांनी पक्षात सर्वांचे स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


''आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. कार्यकर्त्यांशी असणारी नाळ जपणारे, राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या अडचणींमध्ये खंबीरपणे साथ देणारे आमचे मित्र प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांच्या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीतील भाजपची ताकद वाढली आहे'', असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष प्रियाताई जोशी, जुनी डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, युवा नेते अनमोल म्हात्रे व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती