HSBC India Manufacturing Manager Index जाहीर- भारताच्या ऑर्डर्समध्ये मजबूत वाढ मात्र, 'यामुळे' नऊ महिन्यातील सर्वाधिक घसरण

प्रतिनिधी: एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजर (HSBC India Manufacturing Manager Index) निर्देशांक काही क्षणापूर्वी जाहीर झालेला आहे. भारताच्या उत्पादनात व ऑर्डर मिळण्यात मोठ्या प्रमाणात मजबूत वाढ झाली असली तरी देखील निर्देशांकात ऑक्टोबर महिन्यातील ५९.२ वरून नोव्हेंबर महिन्यात ५६.६ पातळीवर घसरण झाली. प्रामुख्याने अहवालातील माहितीनुसार, युएस व भारतातील व्यापारी अनिश्चिततेमुळे ही घसरण प्रामुख्याने झाली. ५० आकड्यांच्यावर आर्थिक स्थितीचे संकेत मजबूत समजले जात असून ५० पेक्षा कमी आकडेवारी असल्यास अर्थव्यवस्था बिकट स्थितीत पोहोचल्याचे संकेत या निर्देशांकात मिळत असतात. एस अँड पी ग्लोबल या जागतिक दर्जाच्या अँनालिटिक्स कंपनीने ही आकडेवारी बाजारात प्रसिद्ध केली आहे. अहवालातील माहितीनुसार, अर्थात मागणीत मजबूत वाढ झाली असली तरी देखील निर्देशांकात नऊ महिन्यातील सर्वाधिक घसरण झाली. याशिवाय उत्पादन व सेवा या क्षेत्रातील एकत्र मोजमाप करणाऱ्या एचएसबीसी फ्लॅश इंडिया कंपोझिट निर्देशांकात ऑक्टोबर महिन्यातील ६०.४ तुलनेत नोव्हेंबर महिन्यात ५९.९ पातळीवर घसरण झाली जी अहवालातील माहितीनुसार, सहा महिन्यांतील सर्वाधिक घसरण झाली आहे.


या अपडेटवर भाष्य करताना एचएसबीसीचे मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले आहेत की,'भारताच्या नोव्हेंबरच्या शेवटच्या पीएमआयने पुष्टी केली की अमेरिकेच्या करांमुळे उत्पादन विस्तार मंदावला. नवीन निर्यात ऑर्डर पीएमआय १३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. भविष्यातील उत्पादनाच्या अपेक्षांवरून दिसून येणारा व्यवसाय आत्मविश्वास नोव्हेंबरमध्ये मोठी घसरण दर्शवितो, जो संभाव्यतः शुल्काच्या परिणामांबद्दल वाढती चिंता दर्शवितो. कपातींमुळे वाढ झाली आहे.'


निरीक्षणानुसार, भारतीय उत्पादकांनी ऑर्डर बुक व्हॉल्यूममध्ये लक्षणीय वाढ नोंदवली ज्याचे कारण म्हणजे त्यांनी स्पर्धात्मक किंमतीसह सकारात्मक मागणीचा ट्रेंड आणि ग्राहकांच्या वाढीव आवडीमुळे ही ऑर्डरमधील वाढ नोंदवली आहे. तथापि, आव्हानात्मक बाजार परिस्थिती, प्रकल्प सुरू होण्यास विलंब आणि कंपन्यांमधील स्पर्धा या अहवालांमुळे एकूण वाढीचा दर नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला, असेही अहवालात म्हटले गेले आहे.

Comments
Add Comment

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

नंदुरबार : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या

ठाकरे बंधूंची युती होताच भाजपने दिला मोठा दणका

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महापालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

बंदी असलेल्या गांजा आणि चायनीज मांजाची पुण्यात राजरोस विक्री

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आणि त्यांच्या आसपासच्या भागात बंदी असलेल्या गांजा या

शरद पवारांच्या पक्षाला भगदाड, शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा राजीनामा

पुणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान