Pune Crime : मैत्रिणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या! पुण्यात दुहेरी हत्याकांड; संगमवाडी परिसरात थरार, तरुणाचे खळबळजनक पाऊल

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हत्या, मारामारी, गुंडागर्दी आणि 'कोयता गँगची' दहशत अशा घटनांनी पुणेकर त्रस्त आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा पुण्याला हादरवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने आधी एका तरुणीची हत्या केली आणि त्यानंतर त्याने स्वत: देखील आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. या दुहेरी घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या तरुणाने तरुणीची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाहीये. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.



नेमकं काय प्रकरण ?


पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या मैत्रिणीची निर्घृण हत्या करून त्यानंतर स्वतःचे जीवनही संपवल्याने शहरात तणावाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळे (वय २८) नावाच्या तरुणाने पुण्यातील संगमवाडी परिसरात आपल्या मैत्रिणीची हत्या केली. त्यानंतर, त्याने तळेगाव येथे जाऊन स्वतःही आत्महत्या केली. हत्या झालेली तरुणी आणि आरोपी तरुण गणेश काळे हे दोघेही पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात कामाला होते. आरोपी तरुण गणेश काळे हा मूळ बीडचा रहिवासी होता, तर मृत तरुणी पुण्यातीलच रहिवासी होती. ते दोघेही एकाच ठिकाणी नोकरीला असल्याने त्यांची मैत्री होती. पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी काही कारणांवरून वाद झाला होता. याच प्रेमसंबंधातील वादातून गणेश काळेने हे टोकाचे पाऊल उचलले आणि हे हत्याकांड घडवले असावे. या प्रकरणाचे मूळ कारण आणि सखोल माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

LPG Scam : पोलिसांनी उधळला LPG सिलिंडरचा काळा बाजार करण्याचा डाव

ठाणे : पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून देशात ठिकठिकाणी एलपीजी सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा प्रहार; २६ लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

पुणे : छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात धडक

Nagpur News : नागपुरात IPL सट्टेबाजीचा मोठा पर्दाफाश; ४० लाखांची रोकड जप्त, 'दुबई कनेक्शन'ने पोलीस चक्रावले!

नागपूर : आयपीएलच्या (IPL) रणधुमाळीत नागपूर शहरात सट्टेबाजीचे जाळे वेगाने पसरल्याचे समोर आले आहे. प्रतापनगर

Dhule News : रक्तदाब घटला, झटके आले अन्... धुळ्यातील अविवाहित तरुणीचं गर्भपात प्रकरण उघड

धुळे : धुळे शहरालगतच्या एका गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाआधीच गरोदर राहिलेल्या एका १८ वर्षीय

Nashik Crime IT Company : हाऊसकिपींगच्या वेशात नाशिकच्या महिला पोलिसांनी केला आयटी कंपनीचा पर्दाफाश; उलघडले अनेक खुलासे

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्या महिलांना फसवणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण सुरु असतानाच नाशिकच्या

Ashok Kharat Case : अशोक खरातला पुन्हा ५ दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक : भोंदूगिरी व महिलांच्या शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढल्या असून,