Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा प्रहार; २६ लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

पुणे : छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात धडक कारवाई करत आंध्र प्रदेशातून विक्रीसाठी आणलेला मोठा गांजाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून सुमारे ३१ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.



गुप्त माहितीच्या आधारे सापळा



पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, नारेगाव परिसरातील छत्रपती नगर, काकडे संकुल भागात गांजाची मोठी खेप येणार आहे. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. यावेळी संशयास्पदरीत्या आढळलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाची झडती घेतली असता, पोलिसांना त्यामध्ये गांजाचा साठा मिळून आला.



३१ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त


या कारवाईत पोलिसांनी विदेश सुरेश माचरे (वय ३८ वर्षे, व्यवसाय-चालक) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या वाहनातून पोलिसांनी तब्बल ५३ किलो ४४१ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.या गांजाची किंमत सुमारे २६ लाख ७२ हजार ५० रुपये असून एकूण मुद्देमाल वाहन आणि गांजा मिळून ३१ लाख ७२ हजार ५० रुपये.



आंध्र प्रदेश कनेक्शन आणि पुढील तपास


प्राथमिक तपासात हा गांजा आंध्र प्रदेशातून तस्करी करून आणल्याचे समोर आले आहे. हा साठा कोठून आणला, यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत आणि शहरात हा गांजा कोणाला विकला जाणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. ही कारवाई सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने यशस्वी केली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास लहाने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा