Nashik Crime IT Company : हाऊसकिपींगच्या वेशात नाशिकच्या महिला पोलिसांनी केला आयटी कंपनीचा पर्दाफाश; उलघडले अनेक खुलासे

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्या महिलांना फसवणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण सुरु असतानाच नाशिकच्या आयटी कंपनीतून धक्कादायक गोष्ट समोर आली, नावाजलेल्या आयटी कंपनीत मांडलेला धर्मांतराचा खेळ, नाशिकच्या महिला पोलिसांनी हाणून पाडला आणि समोर आल्या अनेक धक्कादायक गोष्टी



हे मिशन नक्की ठरल तरी कस?


थोडक्यात, त्या कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीद्वारे हे प्रकरण उघडकीस आले. नेहमी मॉडर्न कपडे घालणारी, उपवास न करणारी मुलगी अचानक पूर्ण कपडे घालते, महिनाभर उपवास ठेवते,या गोष्टीचा संशय तिच्या पालकांना आला आणि पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले, त्या कंपनीत सहज प्रवेश मिळणं हे अश्यक होत, त्यामुळे महिला पोलिसांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेशात कंपनीत पाऊल टाकले आणि उघडकीस आला तो नाशिकच्या आयटी कंपनीचा धर्मांतराचा काळा बाजार नाशिकच्या महिला पोलिसांनी सफाई कर्मचारीचा वेश घेऊन त्या कंपनीत शिरल्या. अनेक बारीक गोष्टींवर महिला पोलिसांची करडी नजर होती. यातून अनेक धक्कादायक खुलासे महिला पोलीस पथकाने गोळा केले आहेत.



महिलांचा छळ


महिलांना काम संपल्यानंतरही ऑफिसमध्ये थांबवून कंपनीचे काम आहे हे ते करावंच लागेल असं भासवून संशयास्पद प्रकार करत असल्याचे महिला पोलिसांच्या लक्षात आले. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणींना लक्ष करून आपल्या जाळयात ओढण्याचे काम , त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार, आर्थिक छळ, तसेच जबरदस्तीने धर्म स्वीकारण्यास भाग पाडला जात होता. पथकाने प्रत्यक्ष कंपनीत वावरत असताना संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवत, मिटींग्स दरम्यान होणारे अश्लील हावभाव आणि गैरवर्तन पोलिसांनी पहिले होते. कंपनीच्या मालमत्तेचा वापर करत व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक प्लॅन्स आणि ऑपरेशन्स तयार करून कंपनीत ते राबवले जायचे.


नाशिक पोलिसांनी या प्रकारांचा छडा लावण्यासाठी या प्रकरणाच्या खोलात शिरण्यासाठी वेषांतर करून, कंपनीत वावरताना अनके पुरावे जमा केले. जवळपास ४० हुन अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत ठोस पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी नाशिकमध्ये ९ गुन्हे दाखल झाले असून आता SIT कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.

Comments
Add Comment

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली