मुंबई : काहीच दिवसांत २०२५ वर्ष निरोप घेईल आणि नवीन वर्षाची सुरुवात होईल. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. नवीन कॅलेंडरनुसार आगामी वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण १४ अनिवार्य सुट्ट्या मिळणार आहेत. याशिवाय, कर्मचारी आपल्या पसंतीनुसार ३ सुट्ट्या निवडू शकतील, तर १२ सुट्ट्या या ऐच्छिक स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही विविध सण-उत्सव, राष्ट्रीय दिवस आणि धार्मिक कार्यक्रमांनुसार सुट्ट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कोणत्या दिवशी सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत, याबद्दलची माहितीही स्पष्ट करण्यात आली आहे.
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी अशाप्रकारे :
२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन
४ मार्च – होळी
२९ मार्च – ईद-उल-फितर
३१ मार्च – राम नवमी
१ एप्रिल – महावीर जयंती
३ एप्रिल – गुड फ्रायडे
३१ मे – बुद्ध पौर्णिमा
२६ जून – बकरी ईद
१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
४ सप्टेंबर – जन्माष्टमी
२४ सप्टेंबर – ईद-ए-मिलाद
२ ऑक्टोबर – गांधी जयंती
२१ ऑक्टोबर – दसरा
२१ नोव्हेंबर – दिवाळी
२९ नोव्हेंबर – गुरु नानक जयंती
२५ डिसेंबर – ख्रिसमस
कर्मचार्यांना निवडता येणाऱ्या ऐच्छिक सुट्ट्या :
१ जानेवारी – नवीन वर्ष
१४ जानेवारी – मकर संक्रांती
१६ जानेवारी – वसंत पंचमी
१२ फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती
२६ फेब्रुवारी – होळी दहन
१९ मार्च – गुढी पाडवा
५ एप्रिल – इस्टर
८ मे – टागोर जयंती
२६ ऑगस्ट – ओणम
१४ सप्टेंबर – गणेश चतुर्थी
१८ ऑक्टोबर – दसरा
३० ऑक्टोबर – करवा चौथ
१४ डिसेंबर – ख्रिसमस
ऑप्शनल सुट्ट्या (२०२६) :
दसरा, होळी, जन्माष्टमी, राम नवमी, महाशिवरात्री, गणेश चतुर्थी, मकर संक्रांती, रथयात्रा, ओणम, पोंगल, वसंत पंचमी, गुढी पाडवा