हिंजवडी-वाघोली वाहतूक कोंडीला ब्रेक; PMRDAचा नवा मास्टरप्लॅन जाहीर

पुणे : पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी PMRDA ने मोठी पावले उचलली आहेत. हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर या वेगाने विकसित होणाऱ्या परिसरांमधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्राधिकरणाने सविस्तर मास्टरप्लॅन जाहीर केला आहे. अक्कुर्डी येथील PMRDA मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महसूल, पोलीस, एमआयडीसी, हायवे प्राधिकरण, मेट्रो आणि स्थानिक प्रतिनिधी यांसह सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.


प्राधिकरणाने तातडीने राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती हा प्रमुख मुद्दा आहे. स्थानिक नागरिक संस्थांना ५ डिसेंबरपर्यंत सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे भरून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे या भागातून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


नव्या कृती आराखड्यात रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल, आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पांचा समावेश आहे. वाघोली ते शिक्रापूर दरम्यानच्या ३० मीटर रुंदीच्या समांतर रस्त्याचे काम सध्या सुरू असून जमीन संपादन प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे. तसेच पूर्वीच्या प्रादेशिक आराखड्यातील पर्यायी मार्गांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. हे मार्ग विशेषतः शिक्रापूरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यात मदत करतील. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नव्या सिग्नल व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, आणि अवजड वाहनांवरील नियमांचे काटेकोर पालन यावर भर दिला जाणार आहे. ट्रक आणि डंपर चालकांसाठी ३० किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा कायम राहील तसेच सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांची बसवणी अनिवार्य असेल. कोणत्याही अपघाताच्या प्रसंगी चालक, वाहन मालक आणि कंत्राटदार यांची संयुक्त जबाबदारी निश्चित केली जाईल.


अधिकाऱ्यांच्या मते, या सर्व उपाययोजनांमुळे पुण्यातील गर्दीच्या मार्गांवरील वाहतूक लक्षणीयरीत्या सुरळीत होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर बनेल. PMRDA चा हा नवीन मास्टरप्लॅन योग्य रितीने राबवला गेला तर पुढील काळात पुण्यातील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर बदलू शकते.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक