हृषिकेश जोशी यांचा ‘बोलविता धनी’ आहे तरी कोण?

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेले आणि लेखक-दिग्दर्शक म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केलेले अष्टपैलू कलाकार हृषिकेश जोशी हे रंगभूमीवर पुन्हा एकदा एका नव्या आणि अत्यंत रंजक विषयावर आधारित नाटक घेऊन येत आहेत. ‘अमरदीप + कल्पकला + सृजन थिएटर्स’ निर्मित, रसिकराज प्रकाशित आणि ‘सेरेंडिपिटी आर्ट्स’च्या सौजन्याने साकारलेले हे नवे नाटक म्हणजे ‘बोलविता धनी’. नांदी नाटकानंतर हृषिकेश जोशी यांचे लेखक-दिग्दर्शक म्हणून हे दुसरे मोठे नाटक असून, या प्रयोगाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


हृषिकेश जोशी यांनी हे नाटक वर्तमान सांस्कृतिक, समाजकारण आणि राजकारण यावर मार्मिक भाष्य करणारे असल्याचे सांगितले आहे. एनएसडीच्या फॉर्मर डिरेक्टर अनुराधा कपूर यांनी 'गोष्ट संयुक्त मानापनाची' या नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर हृषिकेश यांना या नाटकाच्या विषयावर लेखन करण्याची कल्पना सुचवली. विनोदाचा आणि वास्तवतेचा सुरेख संगम 'बोलविता धनी' हे केवळ भाष्य करणारे नाटक नसून, ते एक रंजक आणि परिपूर्ण मनोरंजन आहे. यात भरपूर विनोद आहे, उत्तम ड्रामा आहे, एक सुंदर लव्हस्टोरी आहे आणि काही जुन्या घटनांचे संदर्भही यात पहायला मिळतील. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही गोष्ट एक वेगळा अनुभव देईल, असा विश्वास हृषिकेश जोशी व्यक्त करतात.


या नाटकात प्रमुख भूमिकेत असलेले क्षितीश दाते, संग्राम साळवी, ओंकार कुलकर्णी, मयुरा रानडे, सिमरन सईद यांसारखे ताकदीचे कलाकार आहेत. त्यांच्यासह प्रद्युम्न गायकवाड, परमेश्वर गुट्टे, निरंजन जावीर, सागर यार्दी, अजिंक्य पोंक्षे, दीपक गोडबोले, नीलेश गांगुर्डे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसतील. विशेष म्हणजे, या नाटकात रंगभूमीच्या पडद्यामागील महत्त्वाचे कलाकार म्हणजेच मेकअपमन, प्रोडक्शन मॅनेजर, हेअर ड्रेसर आणि वेशभूषाकार हे व्यावसायिकही पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत, जे या नाटकाचे वेगळेपण अधोरेखित करते.


हृषिकेश जोशी यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून साकारलेला हा 'बोलविता धनी' कोण आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगांना नक्की हजेरी लावावी. येत्या १३ डिसेंबरला रात्री ९.३० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे तर मुंबई मधील शुभारंभ २४ डिसेंबर दुपारी ४ वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे 'बोलविता धनी' नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे.

Comments
Add Comment

बॉलीवूडचा जलवा हॉलिवूडमध्ये, धुरंधर गाण्यावर थिरकले जोनस ब्रदर्स

मुंबई : सध्या सर्वत्र धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची विक्रमी कमाई, रणवीर सिंग

मल्लिका शेरावतची व्हाईट हाऊस ख्रिसमस डिनरला हजेरी, सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : बॉलिवूडमधील ‘मर्डर’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय

६ फेब्रुवारीला लागणार 'लग्नाचा शॉट'!

लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि तयारी... …पण कधी कधी हाच आनंद गोंधळात बदलला तर? अशाच एका गोंधळावर आधारित ‘लग्नाचा शॉट’

निर्मिती सावंत - प्रार्थना बेहरे झळकणार सासू-सुनेच्या भूमिकेत

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओजचा बहुचर्चित मराठी चित्रपट 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' लवकरच

बॉलीवूड क़्विन माधुरी दिक्षित साकारणार नवी भूमिका: जाणून घ्या कुठे आणि कधी पाहायला मिळणार ...

मुंबई : बॉलीवूडची ग्लॅमर्स अभिनेत्री माधुरी दीक्षित साकारणार हटके भूमिका. ott वर चर्चेत असणारी वेब सिरीज म्हणजेच Mrs

Bollywood actress Shilpa Shetty... बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आणखी एक दणका! मुंबईतील या घरावर आयकर विभागाचा छापा

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि ती तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत कायम वाढ होताना दिसत आहे.