वाडा नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

कुडूस  : वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून वाडा नगरपंचायत निवडणुकीत खरी लढत ही तिरंगी व चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. भाजपा, शिवसेना (शिंदेगट), शिवसेना (उबाठा) व माकप अशा चार राजकीय पक्षांकडून नगराध्यक्षपदासाठी आपले मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. या सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने निवडणूक चुरशीची होणार यात शंकाच नाही. वाडा नगरपंचायतीत कोण बाजी मारून नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान होणार याकडे वाडावासीयांचे लक्ष लागले आहे. वाडा नगराध्यक्षपदासाठी भाजप कडून रिमा गंधे, शिवसेना (उबाठा) गटाकडून निकिता गंधे, शिवसेना ( शिंदे गटाकडून) हेमांगी पाटील, तर माकपकडून निकिता धानवा या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत, मात्र तीन उमेदवारांमध्ये खरी लढत चुरशीची व रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे. अडीच -तीन वर्षांपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन राजकीय पक्षाच्या फुटीनंतर शिवसेना (शिंदेगट) शिवसेना (उबाठा गट) तर राष्ट्रवादी ( शरद पवार गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) असे गट तयार झाले आहेत. या पक्ष फुटीमुळे मतांची ही मोठी विभागणी झाली आहे. भाजपमध्ये काही दिवसांपासून इतर पक्षांतील कार्यकर्त्यांची मोठी इनकमिंग सुरु असल्याने वाडा शहरात मोठी ताकद वाढली आहे. सबका साथ! सबका विकास व हिंदुत्व हे भाजपचे धोरण जनतेच्या पसंतीस उतरले असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात उमेदवार व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणूक प्रचाराचा आढावा घेतला. तसेच निवडणूक संदर्भात योग्य मार्गदर्शन केल्याने कार्यकर्त्यांचे बळ व उत्साह वाढला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाली आहे. मात्र वाडा शहरवासीयांची मते कुणाच्या पारड्यात पाडतात हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

'सनई चौघडे' मध्ये पहिल्यांदाच आईची भूमिका साकारणार अदिती सारंगधर

मुंबई : ‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत

समर्थ ई-मोबिलिटीकडून भारतात डिझाइन करण्‍यात आलेला १०० टक्‍के स्‍वदेशी फुल-स्‍टॅक ईव्‍ही टेक्‍नॉलॉजी प्‍लॅटफॉर्म लाँच

अहमदाबाद : भारताच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलता प्रवासामध्‍ये महत्त्वपूर्ण टप्‍पा गाठत समर्थ ई-मोबिलिटी प्रा. लि. या

अक्षय कुमारच्या भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार

मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्सने भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता

ॲमेझॉन इंडिया ने आर्मी विमेन्स वेल्फेयर असोसिएशन बरोबर केला सहकार्य करार

- सैन्यदलातल्या कुटूंबातील महिलांमध्ये व्यावसायिक संधी वाढीस लागण्यासाठी करणार मदत बंगळुरु : आंतरराष्ट्रीय

मॅरियट बॉनव्हॉय आणि स्विगीची भागीदारी; दैनंदिन जीवनात मिळणार आनंद

स्विगीच्या विविध ऑफरिंग्समधून मिळणार मॅरियट बॉनव्हॉयचे फायदे मुंबई : मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कारप्राप्त

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय