हिंदी महासागरात चौथे चिनी हेरगिरी जहाज दाखल!

नवी दिल्ली  : भारताने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी दिलेल्या नोटाम इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, चौथे चिनी हेरगिरी जहाज हिंदी महासागरात दाखल झाले आहे.या चिनी जहाजाच्या हालचालींवर भारतीय नौदल व सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारताच्या संरक्षण क्षमतेची माहिती गोळा करण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा हा एक भाग मानला जात आहे. चीनची ही जहाजे हिंदी महासागरात गस्त घालत आहेत. संशोधनाच्या नावाखाली ते हेरगिरी करत आहेत. भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी हे चिनी जहाज येथे दाखल झाले आहे.


जेव्हा भारत क्षेपणास्त्र चाचणी करतो, तेव्हा समुद्रातील जहाजांसाठी आणि विमानांसाठी धोक्याचा इशारा म्हणून नोटाम जारी केला जातो. या काळात, चीन अशी जहाजे पाठवून भारताच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचे टेलीमेट्री डेटा व इतर महत्त्वाच्या संरक्षण प्रणालीची गुप्तचर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो. या क्षेत्रात भारताच्या सुरक्षेला आव्हान देण्यासाठी चीन जाणीवपूर्वक असे पाऊल उचलत आहे.

Comments
Add Comment

टाकाऊ कपड्यांतून साकारली कलाकृती; पंतप्रधान मोदीचं ६ फूट पोर्ट्रेट चर्चेत

ब्रह्मपूर (ओडिशा):येथील तरुण फॅशन डिझायनर्सनी आपल्या कल्पकतेतून आणि परिश्रमातून एक अनोखी कलाकृती साकारत

काँग्रेसच्या माजी आमदाराला अटक; एनआरआय महिलेच्या तक्रारीवरून तिसरं प्रकरण उघड

पथनमथिट्टा (केरळ) : काँग्रेस पक्षाचे माजी नेते आणि आमदार राहुल ममकुटाथिल यांना महिलेशी गैरसंबंधान बाबत गंभीर

ताजमहालचे तळघर उघडणार! ३ दिवस मोफत पाहण्याची संधी

उर्सच्या कालावधीत पर्यटकांना आणि भाविकांना विशेष सवलती आग्रा: जगातील सातवे आश्चर्य मानल्या जाणाऱ्या

रायसीना हिल्सजवळ पंतप्रधान मोदींचे नवे कार्यालय

निवासस्थानही बदलणार नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रायसीना हिल्स परिसरातील नवे कार्यालय आता

जि. प. निवडणुका फेब्रुवारीत

सर्वोच्च न्यायालयाकडून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ नवी दिल्ली :राज्यातील सर्व स्थानिक

पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर होणार, २८ जानेवारी रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होणार

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जाणार आहे. लोकसभा अध्यक्ष