पंतप्रधान मोदी देशवासियांशी १२८ व्यांदा 'मन की बात' मधून संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी १२८ व्यांदा 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. हा 'मन की बात' कार्यक्रमाचा १२८ वा भाग आहे. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन नेटवर्क, ऑल इंडिया रेडिओ न्यूज वेबसाइट आणि न्यूजऑनएअर मोबाईल अॅपवर प्रसारित केला जाईल. ऑल इंडिया रेडिओ न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच ऑल इंडिया रेडिओ प्रादेशिक भाषांमध्ये देखील कार्यक्रम प्रसारित करेल.


पंतप्रधान मोदींनी १२७ व्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे छठ सण, कोरापूट कॉफी, ऑपरेशन सिंदूर, जीएसटी बचत महोत्सव आणि भारतीय जातीच्या कुत्र्यांसह इतर अनेक विषयांवर जनतेशी संवाद साधला होता. यावेळी पंतप्रधान कोणत्या विषयावर बोलणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.


'मन की बात' हा कार्यक्रम देशाच्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचतो. या कार्यक्रमाद्वारे विकासाकरिता आणि नवनव्या प्रयोगांकरिता देशवासियांना प्रेरित केले जाते. अनेक अभिनव कार्यक्रमांची सुरुवात मोदींनी 'मन की बात'द्वारे जनतेशी संवाद साधत केली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात २०१४ मध्ये झाली. अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय तसेच क्रीडा आदी विषयांवर पंतप्रधान मोदी 'मन की बात' मधून बोलतात. यामुळेच या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.