पंतप्रधान मोदी देशवासियांशी १२८ व्यांदा 'मन की बात' मधून संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी १२७ व्यांदा 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. हा 'मन की बात' कार्यक्रमाचा १२८ वा भाग आहे. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन नेटवर्क, ऑल इंडिया रेडिओ न्यूज वेबसाइट आणि न्यूजऑनएअर मोबाईल अॅपवर प्रसारित केला जाईल. ऑल इंडिया रेडिओ न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच ऑल इंडिया रेडिओ प्रादेशिक भाषांमध्ये देखील कार्यक्रम प्रसारित करेल.


पंतप्रधान मोदींनी १२७ व्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे छठ सण, कोरापूट कॉफी, ऑपरेशन सिंदूर, जीएसटी बचत महोत्सव आणि भारतीय जातीच्या कुत्र्यांसह इतर अनेक विषयांवर जनतेशी संवाद साधला होता. यावेळी पंतप्रधान कोणत्या विषयावर बोलणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.


'मन की बात' हा कार्यक्रम देशाच्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचतो. या कार्यक्रमाद्वारे विकासाकरिता आणि नवनव्या प्रयोगांकरिता देशवासियांना प्रेरित केले जाते. अनेक अभिनव कार्यक्रमांची सुरुवात मोदींनी 'मन की बात'द्वारे जनतेशी संवाद साधत केली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात २०१४ मध्ये झाली. अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय तसेच क्रीडा आदी विषयांवर पंतप्रधान मोदी 'मन की बात' मधून बोलतात. यामुळेच या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे.

Comments
Add Comment

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

िववाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो