महाराष्ट्राची सुपरस्टार या कार्यक्रमासाठी निवड...

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल


धनश्री काडगावकरने विविध भूमिका साकारून स्वतःची अशी अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. ‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटात तिने ‘शालू झोका दे गो मैना’ या गाण्यावर थिरकून आपली मनमोहक अदा सादर केलेली आहे. या गाण्यावर प्रेक्षक भलतेच खुश झालेले आहेत.


धनश्रीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिने भरतनाट्यम् केले. पुण्यातील विद्या विकास विद्यालय शाळेत तिचे शालेय शिक्षण झाले. नंतर ती कॉलेजमध्ये असताना तिला नाटकात काम करण्याविषयी विचारण्यात आले. तिने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत भाग घेतला. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत तिने भाग घेतला. महाराष्ट्राची सुपरस्टार या कार्यक्रमाची ऑडिशन पुण्यात सुरू झाली होती. आईच्या आग्रहाखातर ती तिथे जाऊन ऑडिशन देऊन आली. त्यात तिची निवड झाली. तो तिच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. नंतर मुंबईत जाऊन ती ऑडिशन देऊन आली. शेवटी त्या कार्यक्रमात शेवटच्या टॉप पाचमध्ये ती होती. त्यानंतर तिला झी वाहिनीवर एक मालिका मिळाली. साम वाहिनीवर जन्मगाठ नावाची मालिका तिला मिळाली. त्या मालिकेमध्ये तिची मुख्य भूमिका होती. नंतर गंध फुलाचा गेला सांगून ही मालिका कलर्स वाहिनीवर तिने केली. त्यानंतर रुंजी नावाची मालिका केली. त्या भूमिकेसाठी तिला म. टा. सन्मान अवॉर्ड देखील मिळाले. गंध फुलांसाठी देखील तिला म. टा. सन्मान अवॉर्ड मिळाला. तुझ्यात जीव रंगला ही मालिका तिला मिळाली. त्या मालिकेच्या शूटिंगसाठी तिला कोल्हापूरला जावे लागले. सुरुवातीला कोल्हापूरला जाण्यासाठी ती नाराज होती, तिथे आपलं कसे होईल याबद्दल तिला धास्ती होती; परंतु नंतर ती कोल्हापुरात रमली. त्या मालिकेतील तिची निगेटीव्ह भूमिका खूप गाजली. त्यानंतर युवा डान्सिंग क्विन हा रिॲलिटी शो केला. झी वाहिनीवर तू चाल पुढं ही मालिका तिने केली. यू ट्यूबसाठी दालखीचडी ही वेब सिरीज तिने केली. दासबाबू दिग्दर्शित ब्रेव्ह हार्ट या चित्रपटात संग्राम समेळ व धनश्री काडगावकर होती. मृत्यू समोर दिसत असून देखील मोठ्या ब्रेव्ह हार्टने, जिद्दीने जगणाऱ्या तरुण युवकाची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली होती. त्याला साथ देणाऱ्या प्रेयसी, पत्नीची भूमिका तिने साकारली होती. त्या चित्रपटातील तिची भूमिका देखील प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिली होती.


‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटांमध्ये ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणं धनश्रीवर चित्रित करण्यात आलं आहे. या चित्रपटाचे निर्माते यांनी धनश्रीला फोन केला व तिला हे गाणं करण्याविषयी विचारण्यात आले. निर्मात्यांना शालू मॉडर्न, निरागस हवी होती. धनश्रीने शालू चांगल्या रीतीने सादर केलेली आहे. या गाण्याबाबत प्रेक्षकांच्या कोणत्या प्रतिक्रिया मिळाल्या असे विचारल्यावर ती म्हणाली की, काही जण मला म्हणाले की प्रभाकर मोरे यांचे वय जास्त आहे. तू या गाण्यासाठी का होकार दिलास? प्रभाकरजी त्यांच्या कामाने खूप अनुभवी आहेत. त्यांच्या सोबत काम केल्याने त्यांच्या अनुभवाचा उलट मला फायदाच झाला. या गाण्याचे शूट रत्नागिरीमध्ये झाले.


प्रेक्षकांनी तिच्याकडून अशी अपेक्षाच केली नव्हती, की धनश्री असे काही करू शकेल. धनश्रीला देखील स्वतः यावर विश्वास नव्हता की असे काही गाणे तिच्याकडून होईल. यू ट्यूबवर प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया तिला पाहायला मिळाल्या. प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. एका तरुणाचं त्याच्या लहानपणासून एका मुलीवर प्रेम असतं, पण ते प्रेम यशस्वी झालेलं नसतं, त्या मुलीचं त्या मुलाशी ब्रेकअप होताच, हा तरुण पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात अनेक वर्षांनी आपलं स्थान शोधण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नात तो यशस्वी होतो की नाही याची मनोरंजक गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अनेक चढ-उतार असलेल्या या कथानकातून प्रेम या संकल्पनेचा हलक्या-फुलक्या पद्धतीने शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



 

Comments
Add Comment

अभिनयाचा मुसाफिर

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  पंकज विष्णू सध्या अभिनयाच्या हिंदोळ्यावर झुलत आहे. ‘श्री बाबा नीब करोरी महाराज' या

कलावंतांच्या चौकडीचे पंचरंगी ‘शिक्कामोर्तब’

आयुष्यातली महत्त्वाची परीक्षा असो की महत्त्वाच्या ठिकाणी नोकरी असो; नवरा-बायकोचे नाते असो की कोर्ट केसचा निकाल

एका निरीक्षणाची प्रस्तावना

भालचंद्र कुबल-पाचवा वेद एकांकिका स्पर्धांना परीक्षक म्हणून काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रंगभूमीवरील

Entertainment : मनोरंजन विश्वात ऐन उन्हाळ्यात गारवा...

सध्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र होरपळ सुरू असताना, मनोरंजनाच्या माध्यमातून चार घटका करमणूक करणाऱ्या

Vaishnavi Kalyankar : वैष्णवीची पुढील चाल ‘घबाडकुंड’ !

घबाडकुंड’ हा रहस्यमय चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण

Case Study : बदल घडवणारी केस स्टडी ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ !

आम्हां जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या मुलांना व्यसनाधिनता म्हणजे काय? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ऐंशीच्या दशकात