पुण्यात लक्झरी कार घोटाळा; ईडीची मोठी धाड

पुणे : राज्यात तब्बल १९.३८ कोटी रुपयांच्या लक्झरी कार कर्ज घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून अंमलबजावणी संचालनालयाने पुण्यात मोठी धाड टाकली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या युनिव्हर्सिटी रोड शाखेत झालेल्या या गैरव्यवहाराच्या तपासासाठी ईडीने छापेमारी केली. फसव्या कर्जातून खरेदी करण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या कारही जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.


तपासात काय समोर आलं?


ईडीने मंगळवार ते बुधवार, २६ नोव्हेंबरदरम्यान पुण्यातील १२ ठिकाणी – निवासी आणि व्यावसायिक परिसरात एकाच वेळी कारवाई केली. ही चौकशी सीबीआय एसीबी पुणे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या प्रकरणाच्या आधारे सुरू करण्यात आली होती. तक्रारीनुसार, २०१७ ते २०१९ दरम्यान एसबीआयच्या युनिव्हर्सिटी रोड शाखेत मुख्य व्यवस्थापक असलेल्या अमर कुलकर्णी यांनी ऑटो लोन काउन्सलर आदित्य सेठिया आणि काही निवडक कर्जदारांसोबत संगनमत करून बँकेची मोठी फसवणूक केली.


या आरोपींनी बनावट दस्तऐवजांचा वापर करून लक्झरी कारसाठी कर्ज मंजूर करून घेतलं. बँकेच्या लेंडिंग पॉलिसीकडे दुर्लक्ष करून लोन मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. कर्जाची रक्कम जास्त दाखवण्यासाठी फुगवलेल्या कोटेशन्स सादर करण्यात आल्या आणि कोणतीही योग्य पडताळणी न करता कर्ज मंजुरी देण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालं.


कशा गाड्या खरेदी केल्या?


या घोटाळ्यातून बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, वोल्वो आणि रेंज रोव्हर यांसारख्या महागड्या गाड्या घेतल्याचं उघड झालं आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारावर कर्ज घेतले गेल्याने बँकेची कोट्यवधींची फसवणूक झाली.


ईडीच्या धाडीमध्ये अनेक संशयित कर्जदारांची जमीन, इतर मालमत्ता आणि आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात खोटी कागदपत्रे, बनावट कोटेशन्स आणि फसवणुकीचे पुरावे मिळाले असून त्यांची नोंद PMLA कलम १७ अंतर्गत घेण्यात आली आहे.

Comments
Add Comment

माणगावात मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन

२०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत. आयोजकांची माणगाव मध्ये पत्रकार परिषदेतून माहिती. माणगाव :

साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी , ३ महिला बेशुद्ध

छत्रपती संभजीनगर : सध्या छत्रपती संभजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक रीलस्टार ची रील पाहून महिलांनी

Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी

१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड

पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी

हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही; महाराष्ट्रात मराठीचा सन्मान वाढवला जाईल

मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपली ओळख आणि अस्तित्व “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपली