नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचारात महायुतीची आघाडी तर मविआची पिछाडी

मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना सोमवार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या नव्या निर्देशामुळे राज्यात ठिकठिकाणी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या नेत्यांनी प्रचारसभांमध्ये आघाडी घेतली आहे. प्रचारसभांच्या बाबतीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे मागे पडले आहेत.


राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराकरिता पायाला चाकं लावल्याप्रमाणे वेगाने फिरत आहेत तर मविआच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे शिउबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते हवालदील झाले आहेत. स्थानिक स्तरावरच्या निवडणुकीत फार लक्ष देण्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे बोलले. उद्धव यांची मविआच्या इतर नेत्यांनीही री ओढल्याचे दिसते. याउलट महायुतीचे नेते प्रचारसभा घेत फिरत असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.




  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सभा : २५

  2. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सभा : ३९

  3. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या सभा : २७


उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या सभा


नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी एकही सभा घेतलेली नाही. नेत्यांच्या प्रचारसभा होत नसल्यामुळे मविआतील घटक पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यकर्तेच धावपळ करताना दिसत आहेत.

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या

चिंता करू नका, नाशिक - पुणे रेल्वे देवठाण मार्गेच

अकोले (प्रतिनिधी) : चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून तुम्हाला शब्द

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा सत्कार मुंबई : “मुख्यमंत्रीपदी

शिरोडा-वेळाघरमध्ये होणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले पंचतारांकीत हॉटेल

पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; ताज समूहासोबत लवकरच सामंजस्य करार मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील