भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे यांच्यावर वार

अंबरनाथ : भाजपचे कार्यकर्ते सत्यम तेलंगे यांच्यावर कोयत्याने हल्ल केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये बुधवारकाळी घडली. शिवसेना (शिंदे गट)च्या कार्यकर्त्याने हा हल्ला केला असल्याचे कळते. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगे यांच्यावर शिवसेना कार्यकर्ते साहिल वडनेरे याने कोयत्याने हल्ला केला. ही घटना पश्चिम येथील एम्पायर होम सोसायटी येथे घडली. साहिलने त्यांना फोन करून खाली बोलावले आणि शैलेश भोईर, विनोद भोईर, समीर मगर, जयेश मगर व अमन सोनकांबळे यांच्याविरोधात काही बोलायचे नाही. तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. तेलंगे यांच्या मानेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तेलंगे यांचे मनगट, तळहात, अंगठा व पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. इमारतीचे सुरक्षारक्षक अनिल यांनाही धमकी दिली. त्यानंतर साहिल आणि त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत.

Comments
Add Comment

रचना संसद महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव; ‘आउट ऑफ द बॉक्स’ कला कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : रचना संसद कॉलेज यांचे रौप्य महोत्सव वर्ष म्हणजेच 25 वर्ष पूर्ण झाली. महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

घोणसरी येथे मादी बिबट्याला पकडून सोडले अधिवासात

कणकवली : कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सती मंदिर येथे बिबट असल्याचे नागरिकांनी कळवले.

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्र मार्गे अमेरिकेसाठी रवाना - पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी राज्याची पणन व्यवस्था अत्याधुनिक व सर्व सोयी-सुविधायुक्त करण्यासाठी शासन

बॉलीवूड क़्विन माधुरी दिक्षित साकारणार नवी भूमिका: जाणून घ्या कुठे आणि कधी पाहायला मिळणार ...

मुंबई : बॉलीवूडची ग्लॅमर्स अभिनेत्री माधुरी दीक्षित साकारणार हटके भूमिका. ott वर चर्चेत असणारी वेब सिरीज म्हणजेच Mrs

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत