वसई-विरारमध्ये ५२ हजार दुबार मतदार

मतदारांकडून लिहून घेणार हमीपत्र


विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पालिका क्षेत्रातील २९ प्रभागात सुमारे ५२ हजार ३७८ इतक्या मतदारांची नावे मतदार यादीत दुबार आहेत. त्यामुळे या मतदारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून हमी पत्र लिहून घेण्याकरिता पालिका प्रशासनाने पथकांची निर्मिती केली आहे.


महापालिका क्षेत्रात २९ प्रभाग आहेत. २८ प्रभागांमध्ये प्रत्येकी ४ नगरसेवक यावेळी निवडून द्यावयाचे आहेत. तर २९ व्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. अशा प्रकारे एकूण ११५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणुकीची आरक्षण सोडत प्रक्रिया ११ नोव्हेंबरला पार पडली. त्यानंतर प्रभागातील प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या पालिकेने २० नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या आहेत. संपूर्ण पालिका क्षेत्रात एकूण ११ लाख २७ हजार ६४० इतक्या मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून देशभरात दुबार मतदार यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.


वसई-विरार महापालिकेने जाहीर केलेल्या मतदार याद्यामध्ये विविध प्रभागात ५२ हजार ३७८ मतदारांची नावे ही दुबार आहेत. त्यामुळे दुबार नावं असलेल्या मतदारांचा शोध घेण्यासाठी पालिकेने प्रभाग निहाय पथके नियुक्त केली आहे. नऊ प्रभागात नऊ पथके असून एका पथकात सहा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुबार नाव असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार आहे.याबाबत हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


एकूण मतदार - ११,२७,६३७
एकूण पुरुष मतदार -  ६,०१,७४१
एकूण महिला मतदार -  ५,२५,७५०
एकूण इतर मतदार -  १४६


हरकती नोंदविण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
राज्यातील २९ पालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी असलेल्या प्रारूप मतदार याद्यांबाबत हरकती नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर होती; परंतु निवडणूक आयोगाने या कार्यक्रमात सुधारणा केली आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार, दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख १० डिसेंबर करण्यात आली आहे. तसेच, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख २२ डिसेंबर असणार आहे.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील