चार नगर परिषद निवडणुकीसाठी १२५ मतदान केंद्र ; प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार, या नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि इतर साहित्य सामग्रीची आकडेवारी अंतिम करण्यात आली आहे. तसेच एकूण १२५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.


जिल्ह्यातील चारही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण १ लाख १६ हजार ६६० मतदार आहेत. यामध्ये ५९,७५६ पुरुष आणि ५६,८७२ महिला मतदार आहेत. तर ३२ 'इतर' मतदारांचा समावेश आहे. एकूण १२५ मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक ५६ बूथ पालघर नगर परिषदेत असून येथील निवडणुकीत ५५ हजार ७२७
मतदार आहेत.


डहाणू नगर परिषदेत ४१ बूथ असून, ३८ हजार ६९३ मतदार, वाडा नगरपंचायतीत १७ बूथ १२ हजार ८९३ मतदार, तर जव्हार नगर परिषद ११ बूथसाठी ९ हजार ३४७ मतदार आहेत. दरम्यान,या निवडणुकीसाठी आवश्यक असलेले साहित्य आणि ईव्हीएम युनिट्स १० टक्के राखीव साठ्यासह उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी एकूण १३८ कंट्रोल युनिट्स आणि १३८ बॅलेट युनिट्सची गरज आहे. यासोबतच मतदारांना खात्री देणाऱ्या २०८ व्हीव्हीपॅट मशीन आणि ३८० ईव्हीएम बॅटरीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मच्छीमारांच्या सर्वांगीण सर्वेक्षणाला गती

वाढवण बंदर प्रकल्प: जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या

कुडूसला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा

५२ गावांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाची मंजुरी वाडा : वाडा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ५२

पालघरच्या मजुरांचा ‘मस्टर रोल’ राज्यभर पोहोचणार

ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून उपक्रमाचे कौतुक पालघर : पालघर जिल्ह्यातील मनरेगा योजनेअंतर्गत

एकाच महिला नेत्याला मिळाला प्रथम नागरिकाचा मान!

वसई-विरारमध्ये पाच पुरुष महापौर गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी

भाजपच्या रणनीतीपुढे विरोधकांचे पानिपत

विरोधी पक्षांची उडाली धूळधाण आघाडीत बिघाडी कायम वसंत भोईर वाडा : वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत स्वबळावर

जव्हार नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या पूजा उदावंत विजयी

जव्हार : जव्हार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत नगर परिषदेवर