वातानुकूलित लोकलमध्ये बनावट तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिलेस अटक

मुंबई  : रेल्वे तिकीट तपासनिसाच्या सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाकडून बनावट तिकीट कल्याण-दादर वातानुकूलित लोकलमधून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली. नियमित तपासणीदरम्यान आज उजेडात आले. मुंबई विभागाचे तिकीट निरीक्षक विशाल नवले यांनी १०.०२ च्या कल्याण–दादर वातानुकूलित लोकलमध्ये नियमित तपासणीदरम्यान एका महिला प्रवाशाला थांबवले. त्यांनी वातानुकूलित लोकलमध्ये अंबरनाथ –दादर मार्गावर प्रवासासाठी ११ डिसेंबर २०२५ पर्यंत वैध असलेले युटीसद्वारे निर्मित सीझन तिकीट दाखवले. सखोल तपासणी केल्यावर नवले यांना तिकीट संशयास्पद वाटले आणि त्यांनी तत्काळ त्याची पुष्टी मागितली. पडताळणीनंतर हे तिकीट मागील कालबाह्य तिकीटावरून बनवलेले बनावट तिकीट असल्याचे स्पष्ट झाले. महिला प्रवासी गुडिया शर्मा यांना कारवाईसाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले.


त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की, बनावट सीझन तिकीट तिचे पती ओंकार शर्मा यांनी तयार केले होते आणि ते तिला वापरण्यासाठी देण्यात आले होते. भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ (BNS) कलम ३१८/४, ३३६/२, ३३६/३, ३४० आणि ३/५ अंतर्गत फसव्या तिकीट पद्धतींमध्ये सहभागी असल्याबद्दल दोन्ही व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विशाल नवले यांच्या सतर्कतेमुळे बनावट तिकीट रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .


अधिकृत विक्रेत्यांकडून, रेल्वे स्थानकावरील बुकिंग काऊंटरमधून किंवा एटीव्हीएमद्वारे जारी केलेले वैध तिकिटे घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रवाशांना केले आहे. प्रवासी त्यांच्या मोबाईल फोनवर युटीस ॲप डाउनलोड करू शकतात आणि मोबाईल युटीस ॲपद्वारे तिकिटे बुक करू शकतात. प्रवाशांना इशारा देण्यात येतो की, बनावट तिकिटे तयार करणे / मिळवणे किंवा त्यावरून प्रवास करणे यांसारख्या फसवणूक करणाऱ्या मार्गांचा वापर करू नये. अशी कृत्ये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दंडनीय असून, दंड अथवा कमाल ७ वर्षांपर्यंतची कैद किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता