मोहित सोमण: सुदीप फार्मा लिमिटेडचे आज जोरदार लिस्टिंग झाले आहे. शेअर थेट मूळ प्राईज बँडपेक्षा ३०% अधिक प्रिमियम किंमतीवर व्यवहार करत असल्याने एक शेअरची किंमत ७६६- ७६७ या पातळीवर सुरु आहे. ८९५ कोटी मूल्यांकनाचा हा आयपीओ (IPO) २१ ते २५ नोव्हेंबर कालावधीत बाजारात दाखल झाला होता. आज २८ जूनला शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला आहे. कंपनीने आयपीओसाठी ५९३ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला होता. एकूण ०.१६ कोटी शेअर बाजारात विक्रीसाठी दाखल झाले होते. त्या पब्लिक इशूपैकी ९५ कोटींचे शेअर फ्रेश इशू असून उर्वरित १.३५ कोटी शेअर ऑफर फॉर सेल (Offer for Sale OFS) उपलब्ध होते ज्यांचे मूल्यांकन ८०० कोठुन होते. बीएसई व एनएसईवर शेअर सूचीबद्ध झाला आहे.
आयपीओपूर्वी कंपनीने २६८.५० कोटी रुपये अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले होते. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे (Promoter) भागभांडवल ८९.३७% होते ते आयपीओनंतर आता ७६.१५% आहे. कंपनी प्रामुख्याने फार्मा उत्पादनात कार्यरत आहे. कंपनीचे सहा उत्पादन प्रकल्प (Manufacturing) ५०००० MT क्षमतेसह बाजारात कार्यरत आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure) व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. कंपनीच्या आयपीओला एकूण ९३.७१ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते ज्यामध्ये किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांकडून १५.६५ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २१३.०८ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) ११६.७२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते.