Stock Market Opening Bell: सकाळच्या सत्रात संमिश्र तेजीची अस्थिर भावना 'या' कारणामुळे जाणून घ्या आजची निफ्टी पोझिशन

मोहित सोमण:आज शेअर बाजारात सकाळच्या सत्रात तेजीयुक्त संमिश्र प्रतिसाद कायम आहे. प्रामुख्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. सेन्सेक्स २०.९९ व निफ्टी १.६० अंकाने किरकोळ वाढला आहे. किरकोळ वाढलेल्या बँक निर्देशांकासह मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये सुरू असलेल्या घसरणीचा बाजारात धोका कायम राहू शकतो. याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक 'अंतिम' निर्देशांकांची आकडेवारी अखेरच्या सत्रात निश्चित करतील. पण एकूणच बाजारात औत्सुक्याचे वातावरण असले तरी अस्थिरता कायम राहू शकते. आज अधिक निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली असली तरी ऑटो (०.४९%), एफएमसीजी (०.१६%) निर्देशांकात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.


युएस बाजारातील तेजीचा परिणाम आजही बाजारात कायम असला तरी जपानमधील वाढलेल्या महागाई निर्देशांकामुळे आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी भारतातील दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीतील आकडेवारीवर गुंतवणूकदारांची बारीक नजर असू शकते. त्यामुळे सुरूवातीच्या कलात मजबूत फंडामेंटल असूनही गुंतवणूकदार सावधगिरीची भावना बाळगू शकतात.


सकाळच्या सत्रात बँक ऑफ इंडिया (४.९९%), बंधन बँक (२.८१%), अदानी टोटल गॅस (२.७५%), बीएसएसएफ इंडिया (२.३७%), प्राज इंडस्ट्रीज (१.८४%) समभागात सर्वाधिक वाढ झाली असून सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण जेल इंडिया (१०%), पीसीबीएल केमिकल्स (८.३३%), नुवोको विस्टा (४.८४%), व्होल्टास (२.८६%), आयनॉक्स इंडिया (१.५७%), झेन टेक्नॉलॉजी (१.५५%) समभागात झाली आहे.


आज सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलावर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'निफ्टी आणि सेन्सेक्सने काल प्रस्थापित केलेल्या नवीन विक्रमांमधून महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की मर्यादित संख्येने कामगिरी करणाऱ्या लार्जकॅप कंपन्यांमध्ये झालेल्या कमी तेजीमुळे हे नवीन विक्रम आहेत. बाजार नवीन उच्चांकावर असूनही, बहुतेक किरकोळ गुंतवणूकदार, विशेषतः मार्च २०२० मध्ये कोविड क्रॅशनंतर बाजारात आलेले नवीन गुंतवणूकदार, तोटा दर्शविणारे पोर्टफोलिओ धारण करत आहेत. हा विरोधाभास किरकोळ गुंतवणूकदारांना स्मॉलकॅप्सबद्दल असलेले वेड आणि त्यांच्या मूल्यांकनाकडे दुर्लक्ष करून स्मॉलकॅप्स चांगले प्रदर्शन करतील असा त्यांचा विश्वास यामुळे आहे. जर किरकोळ गुंतवणूकदारांना २०२६ मध्ये अपेक्षित असलेल्या तेजीत सहभागी व्हायचे असेल, तर त्यांना वाढीची क्षमता असलेल्या लार्जकॅप्स आणि दर्जेदार मिडकॅप्समध्ये गुंतवणूक करावी लागेल.


जरी सेन्सेक्स आणि निफ्टीने काल नवीन उच्चांक गाठला असला तरी, निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक त्याच्या शिखरापेक्षा सुमारे ९% खाली आहे. ही मोठी घसरण प्रामुख्याने या विभागातील खराब कमाई वाढ आणि उच्च मूल्यांकनामुळे आहे. सर्वसाधारणपणे, स्मॉलकॅप्स अल्प ते मध्यम कालावधीत कमी कामगिरी करत राहण्याची शक्यता आहे.'


सकाळच्या सत्रातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'कालची घसरण आमच्या २६१६५ पातळीच्या घसरणीच्या जवळ संपली, ज्यामुळे आणखी एक वरच्या प्रयत्नाची शक्यता कायम राहिली. परंतु २६४६०-५५० पातळीच्या मार्गावर चालण्यासाठी आपण गती गमावत आहोत. तोपर्यंत, २६२२५ पातळीच्या दोन्ही बाजूंनी चढउतार होण्याची अपेक्षा करा. दरम्यान, २६०९८-२६०३२ पर्यंत घसरण बुल्सना पुन्हा एकत्र येण्यास प्रोत्साहित करू शकते. त्याच खाली घसरण २५८६० उघड करेल.'

Comments
Add Comment

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रविवारपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका, कोण मारणार बाजी ?

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. दोन्ही

नियामक रचनेत फेरफार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाने आरोग्य अधिकाऱ्यांना दिली लाच! ईडीच्या छापेमारीत प्रकरण आले उजेडात

मुंबई: विशिष्ट अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांना तसेच, राष्ट्रीय वैद्यकीय

टोरेसनंतर 'वन क्लिक मल्टिट्रेड' कंपनीचा घोटाळा, गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन संस्थापक पसार

मुंबई: टोरेस घोटाळ्यापाठोपाठ दादरमध्ये आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. विविध ऑफर्सच्या

जमीन घोटाळ्याप्रकरणी शेख हसीनांना २१ वर्षांची शिक्षा!

मुलगा-मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवास नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख

तिन्ही सैन्य दलासह अण्वस्त्रेही असीम मुनीर यांच्या हातात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पाकिस्तानमध्ये सेनेचे वर्चस्व किती आहे, हे यापूर्वीच जगाने बघितलेले आहे. देशाची

श्रीलंकेत ११ दिवसांपासून पावसाचे तांडव!

पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्ता नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून