नगर परिषद, नगरपंचायतीच्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

१ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार


मुंबई : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सुमारे १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचा व्यवस्था करण्यात आली असून त्यात १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे.


राज्यातील २४६ नगर परिषदा तर ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे.


दुबार नावांसमोर डबल स्टार चिन्ह




  1. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे डबल स्टार चिन्ह नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याच्या नावासमोर ते चिन्ह आहे त्याने कुठे मतदान करणार आहोत याची माहिती देणे आवश्यक आहे. अशा मतदाराने एका ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला, तर दुसऱ्या ठिकाणी तशी माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन ठिकाणी त्याला मतदान करता येणार नाही याची खबरदारी निवडणूक आयोगाने यावेळी घेतली आहे.

  2.  नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकांसाठी २८८ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २८८ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर
    ६६ हजार ७७५ इतके अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.


नगर परिषद / नगरपंचायतींची जिल्हा व विभागनिहाय संख्या




  1. कोकण विभाग एकूण - २७

  2. नाशिक विभाग एकूण - ४९

  3. पुणे विभाग एकूण - ६०

  4. छत्रपती संभाजीनगर एकूण- ५२

  5. अमरावती विभाग एकूण - ४५

  6. नागपूर विभाग एकूण - ५५


एकूण मतदार व मतदान केंद्र




  1. पुरुष मतदार-५३,७९,९३१

  2. महिला मतदार-५३,२२,८७०

  3. इतर मतदार-७७५

  4. एकूण मतदार-१,०७,०३,५७६

  5. एकूण मतदान केंद्र- सुमारे १३,३५५

Comments
Add Comment

'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई - पुणे प्रवास होणार सुलभ मुंबई  : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाने

वातानुकूलित लोकलमध्ये बनावट तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिलेस अटक

मुंबई  : रेल्वे तिकीट तपासनिसाच्या सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाकडून बनावट तिकीट कल्याण-दादर वातानुकूलित

बीएमसी गुंतवणूक घोटाळ्याच्या वादाला नवीन वळण

मुंबई  : मुंबई महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्ताने वांद्रे येथील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास

मुंबईत मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकाला बंदी

फुटपाथ, गच्चीवरही जाहिरात लावण्यास नसेल परवानगी मुंबई  : मुंबईत मागील अनेक महिन्यांपासून लटकलेल्या जाहिरात

नियोजनबद्ध तयारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे भुयारी मेट्रो प्रकल्प यशस्वी

व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची माहिती मुंबई  : मुंबईतील वाहतूक सुलभ व सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि

जोगेश्वरीत उबाठासमोरच मोठे आव्हान! भाजपा, शिवसेना एकाचे दोन करू देणार का?

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील जोगेश्वरी विधानसभेत उबाठाचे आमदार म्हणून बाळा नर हे निवडून