कौटुंबिक कथेमुळे प्रसिद्ध झालेलं एक अनोख मंदिर

राजस्थान : भारतातील मंदिरांची ओळख साधारणपणे त्या मंदिरातील देवतेवरून होती असते. मात्र राजस्थानात एक अशी ऐतिहासिक धार्मिक वास्तू आहे, जी देवतेपेक्षा तिच्या मागील कौटुंबिक कथेमुळे अधिक परिचित झाली आहे. ‘देवरानी-जेठानी मंदिर’ नावाने ओळखली जाणारी ही दोन मंदिरे प्रत्यक्षात दोन भावजयांनी उभारली आहेत.


शेकडो वर्षे जुन्या या मंदिरांची निर्मिती भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात झाली होती. दोन्ही मंदिरं भगवान कृष्णाला समर्पित असली तरी इथली खासीयत म्हणजे शिवलिंगांची अनोखी रचना. एका मंदिरात तब्बल ११ शिवलिंगांची स्थापना करण्यात आली असून या भागात शिवपूजेचा खोलवर प्रभाव असल्याने या शिवलिंगांना विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते. स्थानिक भाविकांचा असा विश्वास आहे की या शिवलिंगांवर पाणी अर्पण केल्यास घरात शांतता, समाधान आणि समृद्धी नांदते.


मंदिर परिसरात खास हवन छत्रही आहे, जिथे वेळोवेळी यज्ञ-विधी पार पडतात. भगवान कृष्णाच्या मनोहर मूर्ती तसेच भिंतीवरील आकर्षक नक्षीकाम आजही दशकांपूर्वीच्या कलेची साक्ष देतात. मजबूत बांधकाम व पारंपरिक राजस्थानी शैलीमुळे हे मंदिर स्थानिकांसह पर्यटकांसाठीही केंद्रबिंदू ठरते.


या मंदिरामागे एक रंजक कौटुंबिक कथा सांगितली जाते. बयानी कुटुंबातील दोन भावजयी भगवान श्रीकृष्णाच्या परमभक्त होत्या. त्या दररोज सिकरमधील मदन मोहन मंदिरात पूजेला जात असत. एके दिवशी मोठी भावजय आधी पोहोचली आणि तिने मंदिराचा दरवाजा बंद केला. छोटी भावजय आत येण्यासाठी विनंती करत असताना तिला उत्तर मिळाले—“पूजा करायची असेल तर स्वतःचं मंदिर बांध.” या घटनेनंतर, १९४९ मध्ये छोट्या भावजयीने स्वतःचं मंदिर उभारलं, जे आज देवरानी मंदिर म्हणून ओळखलं जातं. समोरच असलेलं दुसरं मंदिर जेठानीचे, म्हणूनच या दोन्ही मंदिरांना 'देवरानी-जेठानी मंदिर' अशी ओळख मिळाली.


ही मंदिरे राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील सीकर शहरातील चांदपोल गेटजवळ एकमेकांसमोर उभी आहेत. त्यामुळे त्यांना ‘आमनेसामने मंदिर’ असंही म्हटलं जातं. ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक वारसा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायचा असेल तर या मंदिरांना भेट देण्यास हरकत नाही.

Comments
Add Comment

इंडिगो फ्लाईटला हवेत पक्षाची धडक! पायलटच्या प्रसंगावधानाने वाचले २१६ लोकांचे प्राण

वाराणसी : हवेत उड्डाण करत असताना इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानाला पक्षाची जोरदार धडक बसल्याची गंभीर घटना

हिमाचल हादरलं! सोलनमध्ये स्फोट; पोलीस स्टेशनजवळ घडली घटना

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलन जिल्ह्यातील नालागढ पोलीस स्टेशनच्या

महाराष्ट्र झेडपी निवडणूक..!

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत दाखल याचिकांवर आज (१२ जानेवारी २०२६)

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६; देशाच्या अर्थकारणाची दिशा ठरवणार

मुंबई : देशाच्या राजकीय आणि आर्थिक हालचालींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं संसदचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

जम्मू–काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ घुसखोरीचा संशय

जम्मू : जम्मू–काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या (IB) जवळ घुसखोरीचा संशय निर्माण झाल्यानंतर

ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या स्वतःच नष्ट होतात!

सोमनाथ स्वाभिमान पर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सोमनाथ : ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या