विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी ब्लॅकमेलिंग करणारा तरुण अटकेत

मुंबई : एका तरुणाने मॉर्फ छायाचित्रे व्हायरल करण्याच्या दिलेल्या धमकीनंतर कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने नववीतील विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच गोरेगावमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी धमकी देत पैसे उकळणाऱ्या तरुणाला अटक केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीतील तरुणीने ऑगस्ट महिन्यात घर सोडले होते. पालकांनी शोधाशोध केली असता ती चेन्नई येथे मैत्रीणीकडे असल्याचे समजले. तेथून मुंबईत आणल्यावर पालकांनी विचारपूस केली. तेव्हा आरोपी तरुणाकडून मानसिक छळ सुरू असल्याचे तिने सांगितले. पालकांनी संबंधित तरुणास खडसावले. दरम्यान, गेल्या आठवड्यात ही तरुणी मध्यरात्री फोनवर बोलत असल्याने, पालकांनी विचारणा केली. तेव्हा आरोपी तरुण मॉर्फ छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे मागत असल्याचे तरुणीने सांगितले. यापूर्वीही त्याने अनेकदा पैसे घेतले होते. या त्रासातून तिने आत्महत्येचा केली. गोरेगाव पोलिसांनी आरोपीला बोरिवली न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा म्हणाले की, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या धमक्या कोणत्याही व्यक्तीला गंभीर नैराश्यात ढकलू शकतात. यामुळे खोलवर आघात होऊ शकतो, विशेषतः तरुणांना अशा परिस्थितीत, कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा आणि वेळेवर मानसोपचार उपचार खूप महत्वाचे आहेत. जर यात विलंब झाला तर ती व्यक्ती आत्महत्येचे पाऊल उचलू शकते.

Comments
Add Comment

मालाड आणि गोरेगावमधील दोन मनोरंजन मैदानांचा होणार विकास

गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या मुंबई (विशेष

शक्ती वाघाचा मृत्यू न्युमोनियामुळे, शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर

आता राणीबागेत जय आणि करिष्मा वाघाला पाहता येणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व)

अतिवृष्टीचे संकट, पण सरकारचा आधार; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती

मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली

येत्या ३ आणि ४ डिसेंबरला अर्ध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याने

एमएमआरमध्ये २०० किमी जलवाहतूक मार्गांचे जाळे

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून जलवाहतुकीचा पर्याय येत्या काळात उपलब्ध