सोमवार आणि मंगळवारी मुंबईत पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई (३) जलवाहिनीवर, अमर महल भूमिगत बोगद्याच्या (१ व २) शाफ्टला जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी छेद-जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने सोमवार, १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्या पासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. Ya कालावधीत एकूण ११ प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत काही विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, तर काही विभागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद अर्थात १०० टक्के पाणी कपात राहणार आहे.


घाटकोपर (पूर्व) येथील छेडा नगर जंक्शन परिसरात असलेल्या ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला अमर महल बोगदा शाफ्टशी जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी छेद जोडणी करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सोमवार, १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून ते मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत म्‍हणजेच एकूण ३० तास हे कामकाज करण्‍यात येणार आहे. या कामकाजामुळे शहर विभागातील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, एफ उत्‍तर विभाग अर्थात कुलाबा ते परळ, शीव आदी भागात आणि पूर्व उपनगरातील एम पूर्व, एम पश्चिम, एल, एस व एन विभागात कुर्ला भांडुप, नाहूर, चेंबूर, देवनार, गोवंडी आदी भागात पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत काही विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल तसेच काही विभागांचा पाणीपुरवठा बंद राहील.
तरी संबंधित परिसरातील नागरिकांनी या कालावधीसाठी पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


प्रभावित विभागांचा तपशील पुढीलप्रमाणे :


‘ए’ विभाग :* (बीएचआर जलाशय पुरवठा क्षेत्र) सेंट जॉर्ज रुग्णालय, पी. डी'मेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी, भारतीय रिझर्व्ह बँक, नौदल डॉकयार्ड, डाकघर (जी. पी. ओ.) जंक्शन ते रिगल सिनेमा जंक्शन पर्यंत, शहीद भगतसिंग मार्गाच्या बाजूने


‘बी’ विभाग :* वाडीबंदर परिक्षेत्र - नंदलाल जानी मार्ग, लीलाधर सह मार्ग, दाणाबंदर, संत तुकाराम मार्ग, पी. डी.’ मेलो मार्ग, वाडीबंदर
उमरखाडी, नूरबाग चिंचबंदर, वालपाखाडी, कारागृह मार्ग, रामचंद्र भट्ट मार्ग, आनंदराव सुर्वे मार्ग, सामंतभाई नानजी मार्ग, डॉ. माहेश्वरी मार्ग, केशवजी नाईक, भाग एस. व्ही. पी., शायदा मार्ग, फ्लँक मार्ग, नवरोजी टेकडी, तांडेल (निशाण), निशाणपाडा रस्ता. मध्य रेल्वे परिक्षेत्र - रेल्वे क्षेत्र मुंबई बंदर न्यास (बी. पी. टी.) क्षेत्र


डोंगरी ‘बी’ - तांडेल, टनटनपुरा, सॅम्युअल, मोहम्मद उमर, कोकीळ मार्ग, आय. एम. एम., वाय. एम. मार्ग, दोंताड, खडक, इस्राईल मोहल्ला, धोबी, शेरीफ देवजी, व्ही. व्ही. चंदन, दरियास्थान, काजी सय्यद, सय्यद मुखरी, इसाजी, नृसिंहनाथ, जंजीकर, रघुनाथ महाराज, जुना बंगालीपुरा, भंडारी, अभयचंद गांधी मार्ग, लोकमान्य टिळक रस्ता, निशाणपाडा, मशीद बंदर.


बाबुला टँक परिक्षेत्र - इमामवाडा, आय. आर. मार्ग, मोहम्मद अली, मेमनवाडा, पीरू गल्ली, कांबेकर, नाखोडा, कोळसा, नारायण धुरू, अब्दुर रहमान रस्ता


‘सी’ विभाग :* बाबुला टँक परिक्षेत्र - इब्राहिम रहिमतुल्ला मार्ग, मौलाना शौकत अली मार्ग, मौलाना आझाद मार्ग, एस. व्ही. पी. मार्ग, मटन रस्ता, चिमना बुचर रस्ता, बारा इमाम मार्ग, गुज्जर रस्ता, खारा टाकी मार्ग, ब्रिगेडियर उस्मान मार्ग, निजाम रस्ता, मशीद रस्ता, इस्माईल कुरटे मार्ग, बनियान रस्ता, किका रस्ता, बापू गोहल्ला मार्ग, अलीखोटे मार्ग. त्र्यंबक परशुराम मार्ग, दुसरा पठाण रस्ता, पहिला पठाण रस्ता, डॉ. मित्रसेन महिमतुरा मार्ग (तिसरा कुंभारवाडा), संतसेना महाराज मार्ग (दुसरा कुंभारवाडा), भंडारी रस्ता (पहिला कुंभारवाडा), दुर्गादेवी स्ट्रीट आणि दुसरी डंकन गल्ली


‘ई’ विभाग : नेसबिट मार्ग, ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, बदलूपुरा, नागपाडा, शेख हाफिजुद्दीन मार्ग, मेघराज शेट्टी मार्ग, गणेश हरी पारुंडेकर मार्ग, पाईस रस्ता, मुस्सा किल्लेदार मार्ग, सोफिया झुबेर मार्ग, डिमटीमकर मार्ग, एम. ए. मार्ग, टँक पाखाडी मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, के. के. रस्ता.
मुंबई सेंट्रल पुरवठा - एम. एस. अली मार्ग, बेलासिस मार्ग, कामाठीपुरा, एस. पी. मार्ग, शुक्लाजी रस्ता, मनाजी राजूजी मार्ग, आग्रीपाडा.
बाबुला टाकी पुरवठा - डिमटीमकर मार्ग, उंद्रिया रस्ता, खंडिया रस्ता, टेमकर रस्ता, शेख कमरुद्दीन रस्ता, मस्तान टँक मार्ग, टँक रस्ता, काझिपुरा, डंकन मार्ग, जे. जे. मार्ग. दत्ताराम लाड मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाई बाल मुकुंद मार्ग, काळाचौकी, चिंचपोकळी, टी. बी. कदम मार्ग


'एफ' दक्षिण पुरवठा परिक्षेत्र - म्हातार पाखाडी परिक्षेत्र + ताडवाडी म्हातार पाखाडी मार्ग, सेंट मेरी मार्ग, नेसबिट मार्ग, ताडवाडी, रेल्वे कुंपण, शिवदास चापसी मार्ग.


डॉकयार्ड रोड परिक्षेत्र - माझगाव कोळीवाडा, नरसू नाखवा विठोबा मार्ग, ब्रह्मदेव खोत मार्ग, दर्गा गल्ली, नाथ पै मार्ग, डिलिमा रस्ता, रुग्णालय गल्ली, चर्च गल्ली, बेकर गल्ली, नवाब टाकी पूल.


हाथीबाग परिक्षेत्र - हातीबाग परिसर, शेठ मोतिशाह गल्ली.


बी. पी. टी. परिक्षेत्र - मुंबई बंदर न्यास (बी. पी. टी.) क्षेत्र, दारुखाना, लकडा बंदर.


रे रोड परिक्षेत्र - बॅरिस्टर नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलस मिल कुंपण, घोडपदेव परिसर.


माउंट मार्ग परिक्षेत्र - रामभाऊ भोगले मार्ग, फेर बंदर नाका, राणीबाग, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, शेठ मोतिशाह गल्ली, टी. बी. कदम मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. मस्कारेऱहास मार्ग, डी. पी. वाडी, काळाचौकी, नारियल वाडी, संत सावता मार्ग, चापसी भीमजी मार्ग


जे. जे. रुग्णालय - जे. जे. रुग्णालय (दिनांक १ व २ डिसेंबर २०२५ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)


‘एफ उत्तर’ विभाग :* परिक्षेत्र ०१ शीव (पश्चिम), शीव (पूर्व), वडाळा (पूर्व), दादर (पूर्व व पश्चिम)


कोरबा मिठागर, आनंदवाडी, मुंबई बंदर न्यास (बी. पी. टी.), प्रवेशद्वार क्रमांक ०४, शहीद भगतसिंग मार्ग.


प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, डब्ल्यू. टी. टी., न्यू कफ परेड, अल्मेडा कंपाऊंड
रावळी उच्चस्तरीय जलाशय, केंद्रीय कर्मचारी वसाहत (CGS) पुरवठा


रावळी उच्चस्तरीय जलाशय, केंद्रीय कर्मचारी वसाहत (CGS) विशेष पुरवठा


रावळी निम्नस्तरीय जलाशय. कोकरी आगार, केंद्रीय कर्मचारी वसाहत, मुंबई बंदर न्यास पुरवठा


शीव (सायन) हॉस्पिटल परिक्षेत्र


०७ कोरबा मिठागर (विशेष पुरवठा)


अभ्युदय नगर परिक्षेत्र ०१


के. ई. एम., टाटा, एम. जी. एम., वाडिया


शिवडी, वडाळा पूर्व/पश्चिम


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दिनशा पतित मार्ग, एस. एस. राव मार्ग, डॉ. एमेस्ट बोर्जेस मार्ग, परमार गुरुजी मार्ग, गोखले मार्ग


जेरबाई वाडिया मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग


नायगाव


परेल गाव, आचार्य धोंडे मार्ग, विजयकुमार वाळिंबे मार्ग इत्यादी


शिवडी स्मशानभूमी रस्ता, टी. जे. मार्ग, गणेश नगर झोपडपट्टी, शिवडी छेद मार्ग


शिवडी पूर्व गडी अड्डा, शिवडी कोळीवाडा.


मुंबई बंदर न्यास परिक्षेत्र


काळेवाडी परिक्षेत्र – जिजामाता नगर, राम टेकडी मार्ग, मिंट वसाहत.



पूर्व उपनगरे

‘एल’ विभाग : नवीन टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर , नेहरू नगर, मदर डेरी मार्ग, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदीर मार्ग, स. गो. बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व), नवरेबाग, कामा नगर, हनुमान नगर , पोलिस वसाहत , कसाई वाडा, चुनाभट्टी , राहुल नगर, एव्हरार्ड नगर, कुरेशी नगर, तक्षशीला नगर, कॅफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अलिदादा इस्टेट, राजीव गांधी नगर, स्वदेशी जीवन चाळ, चुनाभट्टी फाटक, प्रेम नगर, हिल मार्ग, मुक्तादेवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर


‘एम पूर्व’ विभाग : लल्लूभाई कुंपण, कमला रमण नगर, रमण मामा नगर, शिवाजी नगर, बैंगणवाडी, लोटस वसाहत, गौतम नगर, गायकवाड नगर, अयोध्या नगर, शिवाजी नगर, वाशी नाका, भारत नगर, चिता कॅम्प, मानखुर्द. साठे नगर, झाकीर हुसेन नगर, देवनार गाव, देवनार वसाहत, न्यू भारत नगर, हशू अडवाणी नगर, म्हाडा इमारती, वाशी नाका, वाढवली गाव, भाभा अणुसंशोधन केंद्र (बी. ए. आर. सी.) वसाहत, नटवर पारेख कंपाऊंड.,रफिक नगर, मंडाळा गाव, न्यू मंडाळा, पद्मा नगर, विष्णू नगर, एल. यू. गडकरी मार्ग, आर. एन. ए. उद्यान, कुकरेजा इमारती वाशी नाका, सह्याद्री नगर, चिता कॅम्प, महाराष्ट्र नगर, म्हाडा इमारती, इंडियन ऑइल नगर


बी. डी. पाटील मार्ग येथील रिफायनरी विभाग


‘एम पश्चिम’ विभाग : मैत्री पार्क, घाटला, चेंबूर गावठाण, सुभाष नगर, लालडोंगर, सिद्धार्थ वसाहत, स्वस्तिक पार्क, पोस्टल वसाहत.


चेंबूर कॅम्प, एम. एस. इमारत १-३२


माहुलगाव, म्हैसूर वसाहत, वाशीगाव, वाशीनाका, कोकण नगर, जिजामाता नगर, अंबापाडा. भक्ती पार्क, एम. एम. आर. डी. ए. इमारती


टिळक नगर, ठक्कर बाप्पा वसाहत, पेस्तम सागर, शेल वसाहत, सहकार नगर, पी. एल. लोखंडे मार्ग, छेडा नगर, पी. वाय. थोरात मार्ग, मुकुंद नगर, नागेवाडी, महात्मा फुले नगर


‘एन’ विभाग : विद्याविहार (पूर्व), चित्तरंजन नगर, राजावाडी


संपूर्ण घाटकोपर (पूर्व) विभाग, पंत नगर, गारोडिया नगर, लक्ष्मी नगर, बेस्ट वसाहत, नायडू वसाहत, रमाबाई नगर, कामराज नगर, विक्रोळी गाव, गोदरेज ट्रीज.
घाटकोपर (पश्चिम) येथील काही परिसर, विद्याविहार (पश्चिम), नारायण नगर, महात्मा गांधी मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग ते एन. एस. एस. मार्ग ते श्रेयस सिनेमा, कामा गल्ली, किरोळ आणि खलई गांव, पारशीवाडी, चिराग नगर, महेंद्र उद्यान, नवीन माणेकलाल.


सर्वोदय रुग्णालय, जीवदया लेन, भीमनगर येथील पाण्याच्या टाक्या, नित्यानंद नगर, पवार चाळ, पाटीदार वाडी, गंगावाडी, बरोट वाडी (दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद राहील व दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)


‘एस’ विभाग :* नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व), टागोर नगर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व)

Comments
Add Comment

मुंबईतले रस्ते धुळमुक्त करण्यासाठी 'ही' योजना राबवणार

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत

धुळ प्रदुषण वाढले, मुंबईतील ५३ बांधकामांना काम थांबवा नोटीस

मुंबई - मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कल ‘जनरल मेडिसिन’ कडे

मुंबई (प्रतिनिधी): देशातील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी २०२५) यंदा विद्यार्थ्यांचा कल एमडी

मल जल प्रक्रिया केंद्रांची कामे जलदगतीने

केंद्र उभारणीच्या कामाच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत एकूण ७ ठिकाणी मलजल

बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करणार

मुंबई : राज्यात बेकायदेशीर पद्धतीने तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट

मुंबईत आता मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकाला बंदी..

फुटपाथ आणि गच्चीवरही जाहिरात लावण्यास नसेल परवानगी मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत मागील अनेक महिन्यापासून