वाढवण बंदरातील रोजगारात भूमिपुत्रांना प्राधान्य : मुख्यमंत्री

पालघर : पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणारे मच्छीमार बांधव आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्यावर कोणतीही गदा येऊ नये, या बाबीचा विचार करूनच वाढवण बंदराचे काम सुरू करण्यात आले होते. तसेच तेथील रोजगाराच्या संधीत सुद्धा स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पालघर येथे नगरपरिषद निवडणुक उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी आयोजित सभेत ते बोलत होते


पालघर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास म्हात्रे व इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार राजन नाईक, आमदार हरिश्चंद्र भोये, पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत,वसई-विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


पालघर जिल्ह्यात नवीन प्रकल्पाची विविध कामे हाती घेतली आहेत. विकसित जिल्हा म्हणून या जिल्ह्याची नवी ओळख तयार होत आहे. असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. पंतप्रधानांच्या विकासाचा संदेश घेऊन आपण विकासाची वाटचाल करण्याकरिता येथे आलो असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील