शेअर बाजारात उच्चांकावर मोठी घसरगुंडी! सेन्सेक्स अखेरच्या सत्रात ५०० अंकाने व निफ्टी ८० अंकांने घसरला 'या' कारणांमुळे

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात एक यील्ड पातळी गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भावना न बाळगता मोठ्या प्रमाणात सेल ऑफ करून आपला मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग सुरू केल्याने शेअर बाजारातील एकाच सत्रात सेन्सेक्स ५०० अंकाहून अधिक पातळीवर कोसळला असून निफ्टीही ८० अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८५७६५ या उच्चांकी पातळीवरून ८५४९१.२३ पातळीवर व निफ्टी २६२८५.९५ पातळीवरून २६२०० पातळीवर कोसळला आहे. बाजार तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी सावधगिरीची न बाळगता केवळ छोट्या नफा कमाईवर अवलंबून न राहता नियोजनबद्ध पद्धतीने व वित्तीय शिस्तीने कार्यवाही केल्याने शेअर बाजारातील घसरण झाली आहे. अर्थात शेअर बाजारात सकाळच्या सत्रात चांगल्या पद्धतीने वाढ झाल्याने गुंतवणूकदारांच्या अपेक्षा बळावल्या होत्या मात्र अखेरच्या सत्रात बँक निर्देशांक, तेल व गॅस, रिअल्टी शेअर्समध्ये घसरण झाल्याने व मेटल शेअर्समधील रॅली घसरल्याने अर्थातच इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली असली तरी अद्याप 'हिरव्या' रंगातच बाजार व्यवहार करत आहे.


सकाळी बँक निर्देशांकाने निफ्टीला मोठे बळ मिळावून दिले होते. उदाहरणार्थ एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स ळ अँक्सिस बँक, एल अँड टी, या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बँक निफ्टीत रॅली झाली होती तर इतर कंपन्यांमध्ये बजाज ऑटो, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स एल अँड टी सारख्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजाराने दरपातळी राखण्यात यश मिळवले. मात्र बजाज होल्डिंग्स, आयशर मोटर्स, डीसीएम श्रीराम, इंडियन बँक, टीसीएस, टाटा स्टील यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने बाजारातील रॅली घसरली आहे.


दुपारपर्यंत सेन्सेक्स ८५,४९१.२३ वर घसरला असून दिवसाच्या उच्चांकापेक्षा सुमारे ५६४ अंकांनी कमी तर निफ्टी दुपारी १:३० वाजेपर्यंत २६१५० पातळीच्या खाली २६१४४.७५ पातळीवर आला होता. अशा परिस्थितीत
आयशर मोटर्स, ईटरनल आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन हे निफ्टी५० निर्देशांकात मोठ्या प्रमाणात घसरले होते तर बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे निर्देशांकातील सर्वाधिक वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये होते जे३ टक्क्यांपर्यंत आज वाढले.


आज सेन्सेक्सच्या मासिक डेरिव्हेटिव्ह्जच्या समाप्तीच्या (Monthly Expiry) दिवशी बाजारात मोठ्या हालचाली झालेल्या दिसल्या. आतापर्यंत अनुभव बघता एक्सपायरी सत्रांमध्ये सामान्यतः किमतीत तीव्र चढउतार प्राईज पोझिशन्स बदलल्या जातात अथवा त्यांना स्क्वेअर ऑफ केले जाते.


आजच्या या हालचालीवर जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स म्हणाले आहेत की,निर्देशांक २६१६५ पातळीच्यावर सकारात्मक पूर्वाग्रह राखेल अशी अपेक्षा होती परंतु जर तो २६०९८ पातळीच्या वर राहिला नाही तर आणखी नफा घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.निफ्टी व्यापक निर्देशांकांची कामगिरी पाहता स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये आज अनपेक्षितपणे घसरण झाली आहे आणि दोन दिवसांचा रॅली त्यानिमित्ताने संपली आहे. विशेषतः सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक १४ महिन्यांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले असतानाही हे घडले आहे.


'महत्त्वाच्या निर्देशांकांनी सर्वकालीन उच्चांक गाठला असला तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप विश्वाचा एक मोठा भाग, ज्यामध्ये अनेक क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे, सुधारात्मक किंवा नाजूक क्षेत्रात आहे. रॅलीचा पुढचा टप्पा टिकवून ठेवणे अर्थपूर्ण कमाई पुनर्प्राप्ती, जागतिक मॅक्रोमध्ये स्थिरता आणि सतत देशांतर्गत सहभागावर अवलंबून असेल. आम्ही उच्च पातळीवर गतीचा पाठलाग करण्याऐवजी निवडक, गुणवत्ता-केंद्रित दृष्टिकोनाचा सल्ला देतो' असे बाजार तज्ञ तापसे म्हणाले आहेत. जागतिक कमोडिटी बाजारातही कमालीची अस्थिरता पहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमध्ये ग्रीनबॅकची मागणी कायम राहिल्याने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया किरकोळ किंमतीत घसरत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची वाढलेली गुंतवणूक व कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने काही प्रमाणात बाजारात आधार मिळाला आहे परंतु चलनावर व्यापक दबाव कमी करण्यासाठी ते पुरेसे नव्हते असे फॉरेक्स व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

राज्यातील २९ महापालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार

राज्यभरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; आज निकाल, १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद मुंबई : राज्यातील

मुंबईत भाजप महायुतीला कौल

ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता मुंबई  : मुंबईत उबाठा

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना