Who Is Mary D'Costa? : कोण Mary D'Costa? लग्नाच्या आदल्या रात्री 'तिच्या'सोबत रंगेहाथ सापडला पलाश मुच्छल? धक्कादायक खुलासे!

भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि लोकप्रिय म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल (Palaash Muchhal) दोघेही सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. त्यांच्या नात्यात आलेल्या एका वादळामुळे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सर्वात मोठी बातमी म्हणजे, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी नियोजित असलेला या दोघांचा ग्रँड वेडिंग सोहळा (Grand Wedding) अचानकपणे पुढे ढकलण्यात आला. यानंतर दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चांना उधाण आले. या वादळाचे कारण म्हणजे पलाश मुच्छलच्या खासगी चॅट्सचे काही स्क्रीन शॉर्ट्स व्हायरल झाले, ज्यामुळे दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली. या प्रकरणात आता एका व्यक्तीचे नाव समोर आले आहे, ती म्हणजे कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टा (Mary D'Costa). 'ग्रहण' लागण्याचे कारण मेरी डि'कोस्टा? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाश मुच्छलच्या व्हायरल झालेल्या चॅट्समधील मुलगी ही कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टा आहे. यामुळे स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाला 'ग्रहण' लागण्याचे कारण मेरी डि'कोस्टा आहे का? या एका प्रश्नाभोवती सध्या सोशल मीडियावर आणि बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या संवेदनशील मुद्द्यावर अजूनही स्मृती मानधना किंवा पलाश मुच्छल यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.



लग्न रद्द होण्यामागचं पलक मुच्छलने सांगितले वेगळेच कारण


क्रिकेटर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे अचानक रद्द झालेले लग्न सध्या बॉलिवूड आणि क्रीडा जगतात चर्चेचा विषय बनले आहे. सुरुवातीला या दोघांचे लग्न रद्द होण्यामागे वेगळे कारण सांगितले जात होते, मात्र आता समोर आलेले सत्य खरोखरच धक्कादायक आहे. या दोघांचे लग्न रद्द झाल्यावर, सुरुवातीला स्मृती मंधानाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले, असे सांगण्यात आले होते. इतकंच नाही, तर पलाशची बहिण आणि सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छलनेही याच कारणांवर शिक्कामोर्तब केले होते. पण, काही काळानंतर या प्रकरणात एकापाठोपाठ एक असे धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. यानुसार, लग्न रद्द होण्यामागे स्मृतीच्या वडिलांची तब्येत नसून, पलाश मुच्छलचे इंटरनेटवर व्हायरल झालेले काही खासगी चॅट्स असल्याचे बोलले जात आहे. या व्हायरल चॅट्समुळे दोघांच्या नात्यात मोठे वादळ आले आणि त्यामुळेच २३ नोव्हेंबरला नियोजित असलेले ग्रँड वेडिंग रद्द झाले. या तणावामुळे पलाश मुच्छलची तब्येतही बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. व्हायरल चॅट्समुळे लग्न रद्द झाले असावे, असा कयास आता सर्वत्र लावला जात आहे. या गंभीर विषयावर मंधाना किंवा मुच्छल कुटुंबाकडून कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया अजून आलेली नाही.



पलाश मुच्छलवर स्मृती मंधानाला फसवल्याचा गंभीर आरोप


पलाश मुच्छलवर थेट स्मृती मंधानाला 'धोका' दिल्याचा गंभीर आरोप लावण्यात आल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण वादग्रस्त बनले आहे. या प्रकरणाला वाचा फोडणारी व्यक्ती म्हणजे कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टा (Mary D'Costa). मेरीने पलाश मुच्छलसोबतच्या तिच्या कथित 'फ्लर्टी चॅट्स'चे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हायरल झालेल्या चॅट्सनुसार, पलाश वारंवार मेरीला भेटण्याचा आग्रह धरत असल्याचे दिसून येते. सर्वात गंभीर बाब म्हणजे, जेव्हा मेरीने त्याला स्मृती मंधानासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल विचारले, तेव्हा पलाशने त्यांच्या नात्याला 'मृत' (Dead) आणि केवळ एक 'लाँग डिस्टन्स' रिलेशनशिप म्हणून वर्णन केल्याचे समोर आले आहे. या चॅट्समुळे पलाश मुच्छल फसवणुकीच्या आरोपांमुळे अडचणीत आला आहे. या स्क्रीनशॉट्सची अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नसली तरी, सोशल मीडियावर हे चॅट्स वेगाने व्हायरल होत आहेत आणि याच कारणामुळे मंधाना-मुच्छल यांचे लग्न मोडले असावे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.



मेरी डि'कोस्टा कोण?


क्रिकेटर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्न रद्द होण्यामागील वादग्रस्त प्रकरणामुळे आता कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टा (Mary D'Costa) हे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पलाशचे 'फ्लर्टी चॅट्स' लीक करणारी ही व्यक्ती कोण आहे, याबद्दल आता माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पलाश मुच्छल आणि स्मृती मंधानाच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आणणारी, स्क्रीनशॉट व्हायरल करणारी ही महिला एक व्यावसायिक कोरिओग्राफर आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मेरी डि'कोस्टा ही केवळ बाहेरची व्यक्ती नव्हती, तर ती या दोघांच्या लग्नाच्या तयारीमध्ये सक्रियपणे सहभागी होती! सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या संगीत सोहळ्यातील डान्सची कोरिओग्राफी करण्याची जबाबदारी मेरी डि'कोस्टा हिच्याकडेच होती. जी व्यक्ती अत्यंत खासगी आणि आनंदाच्या सोहळ्याची तयारी करत होती, त्याच व्यक्तीने पलाश मुच्छलचे फ्लर्टी चॅट्स सार्वजनिक केल्याने मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यामुळे स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाला ग्रहण लागले असावे, अशी चर्चा रंगली आहे. मेरी डि'कोस्टाच्या भूमिकेमुळे पलाश मुच्छलवर फसवणुकीचे गंभीर आरोप होत आहेत.



रेडिटवर धक्कादायक दावे


सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता रेडिटवरील काही युजर्सनी या तब्येतीच्या बिघाडामागील वेगळे कारण समोर आणले आहे. रेडिटवरील युजर्सनी आरोप केला आहे की, स्मृती मंधानाच्या वडिलांनी लग्नापूर्वीच्या काही सोहळ्यांमध्ये पलाश मुच्छलला कोरिओग्राफर मेरी डि'कोस्टासोबत पाहिले होते. हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आणि याच कारणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. जरी हे दावे रेडिटवर काही काळानंतर काढण्यात आले असले, तरी यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पलाशचे व्हायरल चॅट्स आणि वडिलांची तब्येत बिघडणे या दोन्ही दाव्यांवर मंधाना किंवा मुच्छल कुटुंबातील कुणीही अद्याप अधिकृत वक्तव्य केलेले नाही. या मौनामुळे या आरोपांवर अधिक चर्चा रंगत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Terror Attack : आग, धूर अन् रक्ताने माखलेली ती रात्र... २६/११ च्या भयावह रात्री 'या' ताज कर्मचाऱ्यांमुळे वाचले शेकडो जीव;

मुंबई : आजचा दिवस २६ नोव्हेंबर भारतीय आणि विशेषतः मुंबईच्या इतिहासातील सर्वात भयानक आणि वेदनादायी दिवसांपैकी एक

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना