Smriti Mandhana Palash Muchhal : धोका देणारी व्यक्ती मी नाही, 'मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा दाखवायचा होता'; मेरी डिकॉस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि लोकप्रिय म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचे लग्न जोरदार चर्चेत होते. त्यांच्या लग्नापूर्वीच्या काही सोहळ्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामुळे चाहते या ग्रँड वेडिंगची आतुरतेने वाट पाहत होते. परंतु, चाहत्यांना मोठा धक्का देत, लग्नाच्या अगदी एक दिवस आधी स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न अचानक पुढे ढकलल्याचे समोर आले. यामुळे दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला यामागचे कारण म्हणून स्मृती मंधानाच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे सांगितले गेले. मात्र, लवकरच यामागील खरे आणि धक्कादायक कारण समोर आले. हे कारण म्हणजे पलाश मुच्छलचे काही खासगी फ्लर्टी चॅट्सचे स्क्रीनशॉर्ट्स जे इंटरनेटवर व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या चॅट्समध्ये पलाश मुच्छल हा मेरी डिकॉस्टा (Mary D'Costa) नावाच्या तरुणीसोबत संभाषण करत असल्याचे दिसून आले. या चॅट्समध्ये पलाशने स्मृतीसोबतच्या नात्याबद्दल केलेले काही उल्लेख, या लग्नाचे ब्रेकअप होण्याचे मुख्य कारण ठरले असल्याची जोरदार चर्चा आहे. या गंभीर घडामोडीनंतर दोन्ही कुटुंबाकडून अजूनही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.



क्रिकेटर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलल्याच्या घटनेनंतर सुरू झालेल्या चर्चांना आता नवा आणि मोठा ट्विस्ट मिळाला आहे. पलाशवर स्मृतीला धोका दिल्याचा आरोप होत असताना, व्हायरल चॅट्समधील तरुणीने एक महत्त्वाची पोस्ट सार्वजनिक केली आहे. लग्न पुढे ढकलण्याचे कारण सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांची तब्येत असल्याचे सांगितले जात होते. पण, त्यानंतर मेरी डिकॉस्टा नावाच्या तरुणीसोबतचे पलाश मुच्छलचे काही फ्लर्टी चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि पलाशने स्मृतीला धोका दिला असल्याचं बोललं जाऊ लागलं. मात्र, आता मेरी डिकॉस्टाच्या नावाचे एक नवीन पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मेरीने स्पष्टपणे म्हटले आहे की, ती पलाशला कधीही प्रत्यक्ष भेटलेली नाही. मेरी डिकॉस्टाच्या या नवीन पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पोस्टमुळे पलाशच्या भूमिकेवर अनेक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. पहिला प्रश्न असा की, जर भेट झाली नसतानाही पलाशने मेरीला DM (Direct Message) का केला? प्रश्न दुसरा असा की, स्मृती मंधानासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाही पलाश तिच्याशी फ्लर्ट (Flirt) का करत होता? हे व्हायरल चॅट्स आणि मेरीच्या स्पष्टीकरणामुळे या दोघांच्या लग्न रद्द होण्यामागील सत्य काय आहे, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पलाश किंवा स्मृतीकडून अजूनही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.

मेरी डिकॉस्टाच्या व्हायरल पोस्टमध्ये मोठा खुलासा; 'तो' खरा चेहरा...





मेरी डिकॉस्टा (Mary D'Costa) हिच्या नावाने व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे आता नवा आणि निर्णायक कलाटणी मिळाली आहे. या पोस्टमधून तिने अनेक महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. व्हायरल पोस्टमध्ये मेरीने स्पष्ट केले आहे की, तिनेच हे चॅट्स (Chats) पोस्ट केले होते, पण तिला तिची ओळख उघड करायची नव्हती. हा खुलासा करण्यामागे तिचा एकमेव उद्देश होता, तो म्हणजे 'पलाश मुच्छलचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा' हा होय. तिने स्मृती मंधानाचा आदर करत असल्याने सत्य सार्वजनिक केल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये मेरीने दोन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत, १. हे चॅटिंग मे आणि जुलै २०२५ दरम्यान, फक्त महिनाभरच सुरू होते. २. 'मी त्याला कधीच भेटले नाही.' यातून पलाश आणि तिच्यात कोणतीही वैयक्तिक भेट झाली नसल्याचे तिने स्पष्ट केले. सोशल मीडियावर तिच्यावर होत असलेल्या आरोपांवर उत्तर देताना तिने म्हटले आहे की, "मी कोरिओग्राफर नाही आणि ज्या व्यक्तीसोबत पलाशनं स्मृतीची फसवणूक केलीय, ती व्यक्ती मी नाही." मेरीने अशीही खंत व्यक्त केली की, हा खुलासा केल्यानंतर हे सर्व तिच्याच विरोधात अशा प्रकारे जाईल, ज्यामुळे तिला तिचे सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट (Private) करावे लागेल, याची कल्पना नव्हती. 'माझा असा कोणताही हेतू नव्हता,' असेही तिने म्हटले आहे. या स्पष्टीकरणामुळे आता पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

राणीबागेतील 'शक्ती' वाघाचा संशयास्पद मृत्यू! आठ दिवसांनंतर व्यवस्थापनाने केले उघड, का केली लपवाछपवी?

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेतून एक धक्कादायक

Mumbai Terror Attack : आग, धूर अन् रक्ताने माखलेली ती रात्र... २६/११ च्या भयावह रात्री 'या' ताज कर्मचाऱ्यांमुळे वाचले शेकडो जीव;

मुंबई : आजचा दिवस २६ नोव्हेंबर भारतीय आणि विशेषतः मुंबईच्या इतिहासातील सर्वात भयानक आणि वेदनादायी दिवसांपैकी एक

Who Is Mary D'Costa? : कोण Mary D'Costa? लग्नाच्या आदल्या रात्री 'तिच्या'सोबत रंगेहाथ सापडला पलाश मुच्छल? धक्कादायक खुलासे!

भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि लोकप्रिय म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल (Palaash Muchhal) दोघेही

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या