वसईत विषारी वायूची गळती ; १३ जण बाधित

वसई : पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वायूच्या सिलेंडरमधून विषारी वायूची गळती झाली. या वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला असून, एकूण १३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वसई पश्चिमेच्या दिवाणमान परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. दक्षता म्हणून महापालिका अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकी समोरील दोन इमारती खाली केल्या आहेत. दिवाणमान परिसरात महापालिकेच्या पाण्याची टाकी आहे.

मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास या पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या क्लोरिनच्या टाकीतून अचानक वायूची गळती सुरू झाली. यामुळे परिसरात वेगाने हिरवा विषारी वायू पसरू लागला. या ठिकाणी दाट नागरी वस्ती असल्याने अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अधिक त्रास असणाऱ्या १३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये स्थानिक नागरिकांसह महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, महापालिका आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी क्लोरिनचा सिलेंडर त्या परिसरातून हटवला आहे. मात्र, वायू विषारी असल्यामुळे बाधित परिसर सील करण्यात आला असून नागरिकांना या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच क्लोरिन वायूची टाकी गास परिसरातील नाल्यात टाकून टाकीची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

अशाप्रकारे झाली विषारी वायुगळती

दिवाणमान येथील पाण्याच्या टाकीतून आसपासच्या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या टाकीचा व्हॉल्व बिघडल्यामुळे पाण्याची गळती सुरू होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्ती ज्या भागात सुरू आहे. त्याच्या मागच्या बाजूस असणाऱ्या खोलीत १० ते १५ वर्ष जुनी क्लोरिन वायूची टाकी ठेवण्यात आली होती. व्हॉल्व दुरुस्तीसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याचा धक्का या टाकीला लागला आणि टाकी जमिनीवर कोसळली. आणि टाकीतून वायू वळती सुरू झाली.
Comments
Add Comment

बॉग बॉस मराठी घरातील पहिली स्पर्धक आली समोर ; ग्लॅमरस अंदाजात झळकली अभिनेत्री

Big Boss Marathi 6 : सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'बिग बॉस मराठीचे स्पर्धक कोणकोण असणार आहेत. मराठी

T-Series चे मालक गुलशन कुमारच्या हत्येतील मुख्य आरोपीचा मृत्यु; नक्की काय झाल ?

टी-सीरिज म्युझिक कंपनीचे संस्थापक आणि देशातील उद्योगपती गुलशनकुमार यांच्या अंधेरी येथील वैश्नवी देवीच्या

Ghodbunder Accident: घोडबंदर रोडवर मोठा अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या

ठाणे: ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर आज सकाळी साखळी अपघाताची घटना घडली. गायमुख ट्रॅफिक चौकीसमोर, ठाणे ते मीरा रोड

वाढदिवस विशेष : कॉलेजमधील स्वप्नांपासून जागतिक सहकार्यासाठी — युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसोबत फरहान अख्तरच्या सर्जनशील प्रवासाचा शिखरबिंदू

फरहान अख्तरच्या वाढदिवसानिमित्त, एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण स्वप्नवत विद्यार्थ्यापासून जागतिक पातळीवर

राज्यातील सर्व महापालिकांवर महायुतीचाच महापौर!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास ठाणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी

खारघर-कामोठ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत गळती आढळून