पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. अंत्यसंस्कारावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार तसेच कुटुंबीयांनी त्यांना अंतिम निरोप दिला. धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारकडून २०१२ साली त्यांना पद्मभूषण या नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. परंतु एवढ्या मोठ्या सन्मानानंतरही त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत. यामागचे कारण आता स्पष्ट झाले आहे.


शासकीय सन्मानासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे समजते. सूत्रांनुसार, धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती प्रशासनाला उशिराने कळवण्यात आली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांकडून अगोदर प्रस्ताव दिला जाणे आवश्यक असते आणि त्यानंतर सरकारी मंजुरी घेतली जाते. मात्र या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी उपलब्ध नसल्यामुळे आणि कुटुंबीयांनीही त्यात स्वारस्य न दाखवल्यामुळे सरकारी सन्मानात अंत्यसंस्कार शक्य झाले नाहीत.


धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी माध्यमांनाही उशिराने समजली. मृतदेह स्मशानभूमीकडे जात असतानाच अनेकांना त्यांच्या निधनाची माहिती मिळाली. हेमा मालिनी स्मशानभूमीत थेट पोहोचल्या, तर अमिताभ बच्चन, आमीर खान यांसारखे कलाकारही शेवटचा निरोप देण्यासाठी तेथे दाखल झाले. शाहरुख खान मात्र अंत्यसंस्कारानंतर पोहोचला.


१९९७ मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार मिळवलेल्या धर्मेंद्र यांना २०१२ मध्ये पद्मभूषण बहाल करण्यात आला होता. मात्र आवश्यक शासकीय प्रक्रिया वेळेअभावी पूर्ण न झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारांना राजकीय इतमाम प्राप्त होऊ शकला नाही.

Comments
Add Comment

Amitabha bachchan Dharmendra : 'अन् निःशब्द शांतता...' धर्मेंद्र यांच्या अंतिम निरोपानंतर 'जय'ची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.

उत्तन - विरार सी लिंकचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत

- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेग मुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत

कस्तुरबा रुग्णालयात उभारणार १३० केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प

दरवर्षी ११ लाख रुपयांची होणार बचत मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करणार

आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था

आज मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक नाही

मुंबई : दर मंगळवारी होणारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक २५ नोव्हेंबर रोजी होणार नाही. स्थानिक स्वराज्य

आहे त्याच दरात, लोकलचा प्रवास होणार गारेगार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईतील युवकांना आश्वासन मुंबई : आम्ही मुंबई लोकलचे सगळे डबे वातानुकूलित