अयोध्या: अयोध्येतील राम मंदिरात आज ध्वजारोहण समारंभ पार पडला. अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर अखेर भगवा फडकला आणि समस्त हिंदूंचे स्वप्न साकार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे या ध्वजारोहण सोहळ्यातून अधोरेखित झाले आहे.
राममंदिरात ध्वजारोहण करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालकांनी गाभाऱ्यात मंत्रोच्चारांच्या घोषात पूजा आणि आरती केली. यानंतर पंतप्रधान, सरसंघचालक आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वज इलेक्ट्रीक बटण दाबताच फडकवण्यात आला. हिंदुच्या विजयाची निशाणी असलेला हा ध्वज जमिनीपासून १९१ फूट उंचीवर आहे. ज्याच्या मध्यभागी सूर्य आणि त्यामध्ये ओमचे चिन्ह आहे. तसेच अयोध्याचे राजवंशीय चिन्ह असलेले कोविदार वृक्ष आहे.
अयोध्या : हिंदूंचे धार्मिक स्थळ असलेल्या राम मंदिरावर आज ध्वजारोहण समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२:१० ते १२:३० या शुभ ...
असे बनले राम मंदिर
९ नोव्हेंबर २०१९ - राम मंदिर निर्माणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी, ट्रस्टद्वारे बांधकामाचे आदेश
५ फेब्रुवारी २०२० - श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा
५ ऑगस्ट २०२० - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचे भूमीपूजन
२० ऑगस्ट २०२० - राममंदिराचे काम प्रत्यक्षात सुरू
२२ जानेवारी २०२४ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिरात राममूर्तीची प्रतिष्ठापना
५ जून २०२५ - राम मंदिराच्या दरबारात अन्य सात देवी देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना
२५ नोव्हेंबर २०२५ - मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण